धक्कादायक... पत्नीच्या आत्महत्येची खबर समजताच पतीनेही संपवली आपली जीवनयात्रा... चार महिन्यापूर्वीच झाला होता विवाह!

Pandharpur Live Online : जामखेडमधील नवदाम्पत्याने पाठोपाठ आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या दोघांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. बुधवारी (ता. 12) दुपारी पत्नीने गळफास लावून घेत घरी आत्महत्या केली, याची माहिती मिळताच तिच्या पतीनेही आपल्या कार्यालयात गळफास लावून घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

धक्कादायक... पत्नीच्या आत्महत्येची खबर समजताच पतीनेही संपवली आपली जीवनयात्रा... चार महिन्यापूर्वीच झाला होता विवाह!

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे पत्नीपाठोपाठ पतीने ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जामखेड शहरात केवळ चार महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या पती- पत्नीने बुधवारी (दि. १२) दुपारी आत्महत्या केली. अजय कचरदास जाधव (वय ३२), शिल्पा अजय जाधव (वय २८, दोघेही रा. बीड रस्ता, जामखेड शहर) अशी आत्महत्या केलेल्याची नावे आहेत.

चार महिन्यापूर्वी अजय व शिल्पा या दोघांचा मोठ्या थाटात विवाह सोहळा झाला होता. शिल्पा जाधव हिने बुधवारी दुपारी बीड रस्त्याजवळील आदित्य गार्डन शेजारी राहत असलेल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती तिचा पती अजय जाधव यास समजली. त्यानंतर काही वेळातच अजय यानेही शहरातीलच मोरे वस्ती येथील त्याच्या पाण्याच्या प्लांटमधील ऑफिसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले.

पती-पत्नीने आत्महत्या का केली? याचे कारण समजू शकले नाही. यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. मयताचा भाऊ अभिषेक कचरदास जाधव याने जामखेड पोलीस ठाण्यात या घटनेची खबर दिली. 

दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. अजयचा भाऊ अभिषेक कचरदास जाधव याने जामखेड पोलिस स्टेशनला याबाबत खबर दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अजय याचा मोठा मित्र परिवार होता. लग्नानंतर काही महिन्यांतच दोघांनीही आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.