स्वतः च्या बचावासाठी दरोडेखोराची फिल्मी स्टाईल, तरुणीच्या गळ्यावर चाकू ठेवून ग्रामस्थाना धमकी

स्वतः च्या बचावासाठी दरोडेखोराची फिल्मी स्टाईल, तरुणीच्या गळ्यावर चाकू ठेवून  ग्रामस्थाना धमकी

Pandharpur Live Online :

अलीगढ : उत्तर प्रदेशातील  अलीगढ जिल्ह्यातील दादो पोलीस  ठाण्यातून रविवारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

येथे एका दरोडेखोरानं स्वत:ला गावकऱ्यांनी वेढलेलं पाहून फिल्मी स्टाईलमध्ये एका मुलीला चाकूचा धाक दाखवून बंधक बनवलं. मुलीला पकडताच त्या दरोडेखोराला गावकऱ्यांनी घेरलं. गावकऱ्यांनी घेरलेलं पाहून दरोडेखोरानं मुलीच्या मानेवर चाकू ठेवला आणि गावकऱ्यांना धमकावले की, जर कोणी माझ्या दिशेनं पुढे आले तर मुलीची मान धडापासून वेगळी करेन. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

त्यानंतर गावकऱ्यांनी दरोडेखोऱ्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचं सांगितलं जात आहे.  कोतवाली अत्रौली भागातील गांगिरी चौकातून तीन चोरट्यांनी ऑटोचालकापर्यंत पोहोचल्यानंतर त्याची ऑटो दादोन भागातील साक्रा येथे जाण्यासाठी बूत केली होती. असे सांगितले जात आहे की, चालकाची ऑटो बुक केल्यानंतर ऑटो मध्येच रस्त्यात आल्यानंतर तिन्ही दरोडेखोर तरुण लुटण्याचा प्रयत्न करत होते.

यादरम्यान ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या तीन मुलांचे संभाषण पाहता ऑटोचालकाला संशय आला. ऑटोचालकाने रस्त्याच्या मधोमध ऑटो थांबवून घटनास्थळी उपस्थित लोकांना गोळा केले. दरम्यान, घटनास्थळी लोकांची गर्दी झाल्याचं पाहून तिघेही चोरटे स्वतःच्या बचावासाठी तेथून पळू लागले.

12 वर्षांच्या मुलीचे वडील गया प्रसाद यांनी सांगितले की, त्यांची मुलगी शेतात जेवण देण्यासाठी आली होती.

ती स्टीलच्या बादलीतून पाणी आणण्यासाठी बाहेर गेली होती, तेव्हा या तरुणाने तिला पकडलं. दरोडेखोराच्या तावडीतून गावकऱ्यांनी मुलीला कसबसं वाचवलं. त्याच वेळी मंडळ अधिकारी चर्रा विशाल चौधरी यांनी सांगितले की, दादो पोलीस स्टेशन अंतर्गत सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक व्यक्ती एका मुलीला मारण्याचा प्रयत्न करत आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे