राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी शिवदास (बापु) बाळासाहेब शिंदे यांची निवड

पंढरपूर (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी पंढरपूर येथील शिवदास (बापु) बाळासाहेब शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा प्रभारी शरद लाड यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवकचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. गणेश राजुबापू पाटील यांनी नुकतेच शिवदास (बापु) शिंदे यांना निवडीचे पत्र दिले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी शिवदास (बापु) बाळासाहेब शिंदे यांची निवड

राष्ट्रवादी युवकचे नुतन जिल्हा उपाध्यक्ष शिवदास (बापु) बाळासाहेब शिंदे हे सन 2007 पासुन सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रीय आहेत. राष्ट्रवादीच्या युवकांची मजबुत फळी निर्माण करुन त्यांनी पक्षाची ध्येय धोरणे आणि कार्याचा प्रसार आणि प्रचार सक्रीयपणे केलेला आहे. त्यांच्या आजतागायत केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांची निवड करण्यात आली असुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातुन सर्वसामान्य युवकांच्या विकासात ते भरीव कार्य करतील व पक्ष संघटना मजबुतीने उभे करतील. असा विश्‍वास राष्ट्रवादी युवकचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. गणेश पाटील यांनी व्यक्त केला आहे.

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा. https://youtube.com/c/PandharpurLive

''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ...................................

     वरिष्ठांनी सोपवलेली प्रत्येक जबाबदारी मी निष्ठापुर्वक आणि सक्रीयपणे, प्रामाणिकपणे पार पाडीन. असे मत यावेळी राष्ट्रवादी युवकचे नुतन जिल्हा उपाध्यक्ष शिवदास (बापु) बाळासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा प्रभारी शरद लाड, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.गणेशदादा पाटील,  जि.प. सदस्य अतुल खरात, प्रदेश सरचिटणीस संकल्प डोळस, प्रदेश कार्यालयीन सरचिटणीस अरुण आसबे, राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात माळी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रथमेश पाटील, मंगेश जाधव, अ‍ॅड. शाम पवार, राष्ट्रवादी काँग्रेस प्रसिध्दीप्रमुख विजय काळे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.