पंढरपूर सिंहगड मध्ये "मानसिक ताणतणाव" या विषयावर प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन व्याख्यान व्याख्यान संपन्न

Pandharpur Live : कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी पुणे येथील असपयरिंग करिअरचे प्रोफेशनल ट्रेनर गुरूराजा कुलकर्णी यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आल होत.

पंढरपूर सिंहगड मध्ये "मानसिक ताणतणाव" या विषयावर प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन व्याख्यान  व्याख्यान संपन्न

हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

     सद्या सर्वञ कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांना कोरोना विषयी घ्यावयाची काळजी तसेच मानसिक ताणतणाव याशिवाय गुगल मिट च्या साह्याने ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होतो.

    या व्याख्यानाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी ऑनलाईन व्याख्याते गुरूराजा कुलकर्णी यांचे ऑनलाईन स्वागत केले. यावेळी बोलताना गुरूराजा कुलकर्णी म्हणाले, कोरोना हा व्हायरस रूपी संसर्गजन्य रोग आहे. या रोगाला घाबरून न जाता आपण स्वतःची काळजी घेणे खुप आवश्यक आहे. सद्या परिस्थिती पहाता सोशल डिस्टनसिंग व सॅनिटायझर वापर करणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे. मास्क नियमित वापर आवश्यक आहे. शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी योगा प्रकार व त्यांचे फायदे तसेच पालेभाज्या, फळे दैनंदिन आहारात आवश्यक आहे. काळजी घेऊनच हा रोग आपण साखळी तोडू घालवू शकतो.

कोरोना ह्या रोगावर घाबरून न जाता मानसिक आधार घेऊन जीवन जगणे आवश्यक आहे हे मत गुरूराजा कुलकर्णी यांनी ऑनलाईन व्याख्यानात बोलताना व्यक्त केले. याशिवाय कोरोना मुळे जे घरी आहेत अशा नागरिकांनी पुस्तक वाचन, ध्यानधारणा याबद्दल सखोल माहिती दिली. कोरोना कालावधीत मानसिक संतुलन कसे ठेवायचे याची सविस्तर माहिती दिली.

   या ऑनलाईन व्याख्यानात पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील १२५ हून अधिक शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेतला. या ऑनलाईन व्याख्यानाचा पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांना निश्चित फायदा होणार आहे. या व्याख्यानाचे सुञसंचलन व आभार ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर यांनी केले.