पंढरपूर सिंहगड मध्ये "रिसेंट ट्रेन्स इन इलेक्ट्रिकल व्हेईकल" या विषयावर कार्यशाळा

पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग व इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग  विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने १६ व १७ एप्रिल २०२१ रोजी "रिसेंट ट्रेन्स इन इलेक्ट्रिकल व्हेईकल" या विषयावर दोन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

पंढरपूर सिंहगड मध्ये "रिसेंट ट्रेन्स इन इलेक्ट्रिकल व्हेईकल" या विषयावर कार्यशाळा
महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत डाॅ. एस. आर. पाटील यांनी "इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिकल व्हेईकल" याविषयावर मार्गदर्शन केले. पुणे येथील डाॅ. सारिका केळकर यांनी " बॅटरीज फाॅर इलेक्ट्रिकल व्हेईकल" याविषयावर मार्गदर्शन केले. नागपूर येथील प्रा. प्रणय शेटे यांनी "स्कोप अँड करिअर ऑपाॅरच्युटीज इन इलेक्ट्रिकल व्हेईकल" याविषयावर मार्गदर्शन केले. माचणुर ता. मंगळवेढा येथील इंजिनिअर सुरज डोके यांनी "डेमाॅनट्रेशन ऑफ इलेक्ट्रिकल व्हेईकल" याविषयावर मार्गदर्शन केले.

ही कार्यशाळा मेकॅनिकल इंजिनिअरींग  विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभाग प्रमुख प्रा. श्रीनिवास गंजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. यामध्ये १५० हून अधिक प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी  महाविद्यालयातील डाॅ. बाळासाहेब गंधारे, प्रा. राहुल शिंदे, प्रा. अंजली चांदणे, प्रा. अर्चना वाघमोडे आदींनी परिश्रम घेतले.