योगचार्या कु. श्रुती शिंदे यांचे कर्मयोगी च्या विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण

Pandharpur Live: कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेज शेळवे येथे रविवार दिनांक 20 जून 2021 रोजी सकाळी 8.00 वाजता शारीरिक शिक्षण विभाग राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने 7 व्या “आंतरराष्ट्रीय योग दिन” निमित्त ऑनलाईन कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते.

योगचार्या कु. श्रुती शिंदे यांचे कर्मयोगी च्या विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण
प्रतीकात्मक छायाचित्रं
प्रतिनिधी:- कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेज शेळवे येथे रविवार दिनांक 20 जून 2021 रोजी सकाळी 8.00 वाजता शारीरिक शिक्षण विभाग राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने 7 व्या “आंतरराष्ट्रीय योग दिन” निमित्त ऑनलाईन कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.पी पाटील हे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे विश्वस्त रोहन परिचारक सर, रजिस्ट्रार  गणेश वाळके सर  ऑनलाइन उपस्थित होते. 

या वेळी मुबंई येथील सुहासनी योग संस्थेच्या प्रमुख साधन वक्ती, तथा सुप्रसिद्ध योगचार्या कु. श्रुती शिंदे, कु. गायत्री काळे यांनी योग दिनानिमित्ताने योग प्रात्यक्षिकासह सविस्तर माहीती दिली व योगासने विविध प्रकार विशद केले. यात त्यांनी वीरभद्रासन, सूर्यनमस्कार, उष्टासन, भुजंगासन,  कपालभारती, अनुलोम, विलोम, भस्त्रिका इत्यादी आसने व प्राणायम चा सराव विद्यार्थ्यांकडून करुन घेतला.  

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा. https://youtube.com/c/PandharpurLive

''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ...................................

 
विद्यार्थ्यांनी नेहमीच योगासने केली पाहिजेत, योगासनांमुळे मन आनंदी व शांत राहते, जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यात योग्य असल्याची भूमिका महत्त्वाची आहे, तसेच योगासन विशेष शास्त्रशुद्ध माहिती देऊन आनंदी जीवनासाठी प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी नियमित व्यायाम केला पाहिजे, असे संबोधित केले महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी अध्यक्षीय भाषणात योग ही जगाला भारताने दिलेली देणगी आहे हे नमूद करताना वेगवेगळ्या रोगावर असमानता प्राण्यांचे उपयोग होऊ शकतो, असे सांगितले. रोज सर्वांनी योग करण्याचे आवाहन केले, सदरील कार्यक्रमास 200 हुन अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा संदीप सावेकर यांनी केले. उपस्थितांचे आभार शारीरिक शिक्षण विभागाचे प्रा गणेश बागल यांनी मानले. प्रमुख साधन योग प्रशिक्षक श्रुती शिंदे यांचा परिचय महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा मुडेगावकर सर यांनी करून दिला. कार्यक्रम पार पाडण्यासाठी  उपप्राचार्य  प्रा जगदीश मुडेगावकर, प्रा डॉ. अभय उत्पात, प्रा अनिल बाबर, प्रा धनंजय शिवपूजे, प्रा सारंग कुलकर्णी, आयटी विभागाचे प्रा दीपक भोसले व महाविद्यालयातील   प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर   कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.