पंढरपूर सिंहगड मध्ये दोन "आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेचे" आयोजन ○ १५ हून देशातील नामांकित शास्त्रज्ञ होणार सहभागी: प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांची माहिती

पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपुर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात दि. २५ व २६ जुन या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने "आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेचे" आयोजन करण्यात आले असून या परिषदमध्ये देशातील विविध नामांकित शास्त्रज्ञ सहभागी होणार असल्याची माहीती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

पंढरपूर सिंहगड मध्ये दोन "आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेचे" आयोजन  ○ १५ हून देशातील नामांकित शास्त्रज्ञ होणार सहभागी: प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांची माहिती

 पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाच्या वतीने अभियांत्रिकी प्रणालीच्या संगणकीय बुद्धिमत्तेवर आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद तर अभियांत्रिकी प्रणालीसाठी माहिती तंत्रज्ञानामध्ये इंटेलिजंट कॉम्प्युटींग वर आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद अशा दोन आंतरराष्ट्रीय स्तरीय शोधनिबंध परिषद होणार आहेत.

या शोधनिबंध परिषद मध्ये नॉर्वे देशातील अग्देर विद्यापीठाचे प्रा. डाॅ. मोहन कोल्हे, कॅश्यायु संघयु विद्यापीठ जपान येथील डॉ. कोकी वोगुरा, स्कूल ऑफ इंजिनिअरींग अँड आयटी माहे दुबई येथील डॉ. रविशंकर दुधे, सौदी अरेबिया येथील प्रिन्स सुलतान विद्यापीठातील डॉ. उमाशंकर सुब्रमण्यम, नांदेड येथील एस जी जी एस इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी मधील डॉ. संजय तलबार, एस. व्ही, एनआयटी सुरत येथील डॉ. अशिष पांचाल, भारतातील एलपी विद्यापीठातील डॉ. सुमनलता ञिपाठी, सेन्ट्रल युनिव्हर्सिटी ऑफ कर्नाटका येथील डॉ.. आर. एस. हेगडी, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर येथील डॉ. राजेंद्र पाटील, पुणे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजचे डॉ. अमर बुचडे, एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे येथील डॉ. पी. एन. महल्हे, एसईआरसी युनिव्हर्सिटी ऑफ चिले येथील डॉ. अतुल सागडे, आदीसह अनेक शास्त्रज्ञ या शोधनिबंध परिषद मध्ये सहभागी होणार आहेत.

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा. https://youtube.com/c/PandharpurLive

''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ...................................


       या शोधनिबंध परिषद मध्ये एआयपी कॉनफरन्स प्रोसिंडिंगज् पब्लिसिर, स्प्रिंजर-नेचर (बीजेआयटी), सीआरसी प्रेस टेलर अँड फ्रान्सिस या प्रकाशकांनी आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद मध्ये सादर होणारे शोधनिबंध प्रकाशित करण्यासाठी करण्यासाठी पंढरपूर सिंहगड महाविद्यालयासोबत सामंजस्य करार केलेले आहेत. या परिषद मध्ये कॉम्प्युटर, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मटेरियल या क्षेत्रामध्ये पदार्थ संशोधनाचा प्रमुख भाग असणार आहे. जगाच्या सर्वांगीण विकासासाठी औद्योगिक क्षेत्रांमध्ये विविध ठिकाणी अपारंपरिक ऊर्जास्ञोत निर्मिती विमान निर्मिती, पुल, वाहन निर्मिती, पदार्थविज्ञान या सर्व क्षेत्रांमध्ये संशोधन करून पर्यावरणपूरक संशोधन होण्यासाठी आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद आयोजित करण्यात आली आहे.


    हि शोधनिबंध परिषद यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. संपत देशमुख, प्रा. नामदेव सावंत, प्रा. सुधा सुरवसे, श्रीनिवास गंजेवार आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी परिश्रम घेणार आहेत.