पंढरपूर सिंहगड मध्ये "ऑउटकम बेस्ड पेडॉगोजी फॉर इफ्फेक्टिव्ह टीचिंग अँड लर्निंग इन इंजिनिअरिंग एजुकेशन " या विषयावर अभियांत्रिकिच्या प्राध्यापकांसाठी एक आठवड्याचा प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न ○५०६ हुन अधिक प्राध्यापकांचा सहभाग

पंढरपूर: प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर, महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी दि. १४ जुन ते १८ जुन २०२१ या कालावधीत "ऑउटकम बेस्ड पेडॉगोजी फॉर इफ्फेक्टिव्ह टीचिंग अँड लर्निंग इन इंजिनीरिंग एजुकेशन " हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

पंढरपूर सिंहगड मध्ये "ऑउटकम बेस्ड पेडॉगोजी फॉर इफ्फेक्टिव्ह टीचिंग अँड लर्निंग इन इंजिनिअरिंग एजुकेशन " या विषयावर अभियांत्रिकिच्या प्राध्यापकांसाठी एक आठवड्याचा प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न  ○५०६ हुन अधिक प्राध्यापकांचा सहभाग

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी विजयवाडा येथील के. एल. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एस. एस. मंथा हे सहभागी होते. या शिबिरात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी स्वागत केले. यावेळी डाॅ. एस. एस. मंथा यांनी "फिलॉसॉफी ऑफ आउटकम् बेस्ड एज्युकेशन" याविषयावर प्राध्यापकांना मार्गदर्शन केले.

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा. https://youtube.com/c/PandharpurLive

''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ...................................


    या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमा मध्ये नामांकित विद्यापीठातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात,डाॅ. मुकल सुतावणे, डाॅ. एम. बी माळी, डॉ. पी. डी. गावंडे, डॉ. आनंद बेऊर, डॉ. पी. बी. माने, डॉ. व्ही. व्ही. शिंदे, डॉ. विनय कुलकर्णी, आणि डॉ. वैभव हेंद्रे यांचे विविध विषयावर प्राध्यापकांना मार्गदर्शन  लाभले.


या प्रशिक्षण कार्यक्रमातुन महाविद्यालयातील प्राध्यापकांना अध्यापनाची गुणवत्ता कशी वाढवावी, तसेच विद्यार्थ्यांचे मुल्यांकन व मूल्यमापन ह्यांचा  नवीन तंत्रज्ञानानुसार वापर कसा करावा याची सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर शैक्षणिक संस्थाना विविध मानांकन मिळविण्यासाठी व संस्थेची गुणवत्ता वाढवण्यासाठी कोणत्या उपक्रमाची अंमलबजावणी केली पाहिजे यावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात ५०६ हुन अधिक प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता.


    हा प्रशिक्षण कार्यक्रम  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, प्रा. भारत आदमिले यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.