आलियाच्या `या ´सवयीमुळे लग्नानंतर उडू शकते रणबीर कपूरची रात्रीची झोप

आलियाच्या `या ´सवयीमुळे लग्नानंतर उडू शकते रणबीर कपूरची रात्रीची झोप

Pandharpur Live Online :

रणबीर कपूर व आलिया भटच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे.

लग्नाची तारीख अद्याप गुलदस्त्यात आहे. पण हो, दोन्ही स्टार्सच्या घरी लगीनघाई सुरू झालीये. घरावर रोषनाई केली जातेय. सामानाची ने-आण सुरू आहे. दोघांच्याही कुटुंबांनी लग्नाची हिंट दिलीये. पण अद्याप काहीही कन्फर्म नाहीये. कारण होणाऱ्या वधू-वराने अद्याप काहीही अधिकृतपणे सांगितलेलं नाही. पण हो, या निमित्ताने का होईना, आलियाचं एक सीक्रेट जगासमोर आलं आहे. लग्नानंतर कदाचित यामुळे रणबीरला थोडी कळ सोसावी लागू शकते.

काही वर्षांपूर्वी आलिया तिला असलेल्या फोबियाबद्दल बोलली होती. होय, आलियाला अंधाराची खूप भिती वाटते. अगदी झोपतानाही ती दिवे चालू ठेवून झोपते. पदडेही पूर्णपणे बंद करत नाही. रात्रभर तिच्या खोलीतील दिवे जळत असतात. कदाचित आलियाच्या या सवयीमुळे रणबीरची रात्रीची झोप उडू शकते. आलियाने तिच्या फ्लाईटबद्दलची भीतीही बोलून दाखवली होती. मी जेव्हा प्रवास करते, तेव्हा नर्व्हस होते. कारण मला फ्लाइटची भिती वाटते. मला विमानातला प्रवास अजिबात आवडत नाही, असं ती म्हणाली होती.

रणबीर कपूर याच्या घरात सर्वांना प्रवेश आहे. पण फक्त दोन गोष्टींना अजिबात प्रवेश नाही. कारण तो त्यांना प्रचंड घाबरतो. ते म्हणजे कोळी आणि झुरळे. त्याला याचा फोबिया आहे. आपण झुरळ पाहिलं की झाडू घेऊन धावतो पण रणबीर पळून जातो.

आलिया व रणबीरच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर आरके हाऊस दिव्यांनी न्हाऊन निघालं आहे. सर्वत्र रोषणाई करण्यात आली आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. रणबीर व आलिया याच आरके हाऊसमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याचं कळतंय. याचठिकाणी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर व नीतू सिंग यांचं लग्न झालं होतं. स्टुडिओ इमारतीसह झाडांवर या लाईट्स लावण्यात आल्या आहेत. आरके स्टुडिओसह रणबीर कपूरचा कृष्णराज बंगलाही सजवण्यात आला आहे. आलिया-रणबीरचं लग्न होत आहे की, नाही याला अद्याप कुटुंबातील कोणत्याही सदस्याने दुजोरा दिलेला नाही. परंतु, घरांवर केलेली सजावट पाहता लग्नाची तयारी सुरू झाली आहे, असे म्हणता येईल.