सुस्ते येथील शंभर पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी केली मदत

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे सुस्ते (ता. पंढरपूर) गावावर संकट ओढवले आहे. गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूरचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी सुस्ते येथील जवळपास शंभर पुरग्रस्त कुटुंबियांना अन्नधान्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे दिसून येत आहे.    

सुस्ते येथील शंभर पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी केली मदत

पंढरपूर:       नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने राज्यात थैमान घातले असून सर्वत्र पाण्यामुळे हाहाकार उडाला आहे. प्रत्त्येक ठिकाणचे दृष्य विदारक दिसत आहे. अशात डॉ. रोंगे सरांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे महान कार्य केले आहे. प्रास्ताविकात अॅड. विजयकुमार नागटिळक म्हणाले की, 'ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्चतंत्र शिक्षण घेण्यासाठी पूर्वी बाहेरगावी जावे लागत होते. डॉ. रोंगे सर कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा यांचे विद्यार्थ्यांना धडे देत त्यांना सुसंस्कारित करत आहेत.

त्यामुळे गोपाळपूरच्या ओसाड माळरानाचे रुपांतर आता नंदनवनात झाले आहे. डॉ. रोंगे सरांनी शिक्षण देत देत सामाजिक बांधिलकी देखील जोपासले आहे. भीमा नदीच्या पुरामुळे आपल्या गावाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील इलेक्ट्रीक मोटारस्टार्टरकेबल जळून गेलीउभी पिके व माती वाहून गेली. पुरात अडकलेल्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. डॉ. रोंगे सरांनी थेट मदतीचा हात देऊन आपल्या गावातील शंभर  पूरग्रस्त कुटुंबियांना आवश्यक अन्नधान्यसाखरतांदूळचहा आदी साहित्याची मदत केली आहे.’ यावेळी शिक्षणतज्ञ डॉ. रोंगे म्हणाले की, ‘सुस्ते मधील नागरिक  पुराच्या परिस्थितीला मागील काही दिवस धैर्याने टक्कर देत धीरोदत्तपणे जीवन जगत आहेत. खरंच त्यांच्या संयमाचे कौतुक करावे वाटते. या गावातील  वकीलसाहेबडॉक्टरमंडळी जागरूक नागरिक यांच्याशी चर्चा केल्यानंतर मदत करण्याचे ठरवले. आपणा सर्वांना सध्याच्या परिस्थितीला तोंड देत संकटावर मात करायची आहे. त्यामुळे धीर सोडू नका. येथील अवस्था पाहून छोटीशी मदत करावीशी वाटली. तरी त्याचा आपण स्वीकार करावा. तसेच सध्याची परिस्थती पाहता गरजू पूरग्रस्तांच्या पाल्यांना 'कमवा व शिकायोजनेतून स्वेरीमधील अभियांत्रिकीफार्मसी व एम.बी.ए. या पदविकापदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण देण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल.’ असे डॉ. रोंगे यांनी सांगितले. यावेळी डॉ. विजय सालविठ्ठलचंद्रकांत सालविठ्ठलगणेश घाडगेशरद लोकरेविष्णू वाघमारेयोगेश चव्हाणश्रीकांत चव्हाणविलास गायकवाड, पांडुरंग कदम, संतोष लोखंडे, अजिंक्य नागटिळक, भाऊ पैलवान, अनिल यादव, प्रसाद करपे यांच्यासह सुस्ते येथील ग्रामस्थ उपस्थित होते.