दुहेरी हत्याकांडामुळे बीड जिल्हा हादरला... दोन भावांची हत्या करून आरोपी चुलतभाऊ पसार

Pandharpur Live Online: : जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत दोघा सख्ख्या भावांना प्राण गमवावे लागले. चुलत भावानेच दोघा भावंडांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. बीड जिल्ह्यातील नागापूर येथे ही घटना घडली. आरोपी चुलत भाऊ घटनास्थळावरुन पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पूर्ववैमनस्यातून आरोपीने दोघा भावंडांना संपवल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दुहेरी हत्याकांडामुळे बीड जिल्हा हादरला...  दोन भावांची हत्या करून आरोपी चुलतभाऊ पसार

राम साळुंके आणि लक्ष्मण साळुंके या दोन सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली. सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

दोघांना मारहाण करुन चुलत भाऊ परमेश्वर साळुंके याने जीव घेतला. त्यानंतर मारेकरी घटनास्थळावरुन पसार झाला आहे. दुहेरी हत्याकांडाची घटना उघडकीस आल्याने बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपी भावाला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.