संतापजनक... 25 वर्षीय अभिनेत्रीसह बहिणीवर 5 नराधमांनी केला अत्याचार

Pandharpur Live Online: नायगाव परिसरात राहणाऱ्या एका 25 वर्षीय अभिनेत्रीसह तिच्या बहीणीवर पाच नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना 24 ते 29 एप्रिल या कालावधीत कर्नाटक राज्यात घडली आहे. पीडीत अभिनेत्रीने वालीव पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपासासाठी आणि चौकशीसाठी कर्नाटक पोलिसांकडे वर्ग केला आहे.

संतापजनक... 25 वर्षीय अभिनेत्रीसह बहिणीवर 5 नराधमांनी केला अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव परिसरात राहणाऱ्या 25 वर्षीय अभिनेत्रीच्या बहिणीला आरोपी महासुबेर परिद याने मद्यामधून गुंगीचा पदार्थ पाजला. त्यानंतर अभिनेत्रीसोबत जबरदस्तीने अत्याचार करुन अश्लील चाळे केले.

नंतर तिच्या बहिणीवरही जबरदस्तीने अत्याचार केले. आरोपी रमेश याने दोन्ही बहीणींचे हात धरुन स्वत: जवळ ओढून अश्लील चाळे करुन मनाला लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. तर आरोपी सुधीरकुमार चंद्रशेखर, अभिनव विख्यात, जगन्नाथ यांनी दोन्ही बहिणींना अर्धनग्न कपडे परिधान करण्यास सांगून त्यांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. तसेच अश्लील काम करण्यास भाग पाडले. ते करण्यास नकार दिल्यावर पाच आरोपींनी दोन्ही बहिणींना शिवीगाळ करुन दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली.

 गुन्हा कर्नाटक पोलिसांकडे वर्ग

वलीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी सांगितले की, या घटनेतील तक्रारदार पोलीस ठाण्यात आल्यावर शनिवारी पाच आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. घटनेचे स्थळ हे कर्नाटक राज्यातील असल्याने हा गुन्हा संबंधित पोलीस ठाण्याकडे तपासासाठी व चौकशीसाठी वर्ग करण्यात आला आहे.