संतापजनक ... नोकरीच्या पहिल्याच दिवशी नर्सवर सामुहिक अत्याचार

नर्सचा नोकरीचा पहिला दिवस असताना तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिचा मृतदेह रुग्णालयाच्या छताला लटकलेला आढळला.

संतापजनक ... नोकरीच्या पहिल्याच दिवशी नर्सवर सामुहिक अत्याचार

Pandharpur Live Online  : नोकरीचा पहिला दिवस हा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो.परंतु या दिवशीच दुर्घटना घडली तर किती वाईट ठरेल. त्यापेक्षाही भयानक प्रकार म्हणजे उत्तर प्रदेशात नर्स नोकरीचा पहिला दिवस असताना तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिचा मृतदेह रुग्णालयाच्या छताला लटकलेला आढळला. विशेष म्हणजे या रुग्णालयाचे उद्घाटन झाले होते. काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचार वाढले चिंता व्यक्त करण्यात येत आहे या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

उन्नावच्या बांगरमाऊ नजिकच्या दुल्लापुरवा गावात पाच दिवसांपूर्वी सुरू झालेल्या एका खासगी रुग्णालयात नर्सवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. सकाळी तिचा मृतदेह रुग्णालयाच्या छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी नर्सच्या आईने चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

हरदोई-उन्नाव मार्गावरील दुल्लापुरवा गावात या नवीन जीवन रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. आशिवान गावातील एका मुलीने येथे नर्स म्हणून काम सुरू केले. याआधी ती दीड वर्षे सफीपूर येथील रुग्णालयात नर्स होती. नवीन हॉस्पिटलमध्ये काम करण्याचा तिचा पहिला दिवस होता, रात्र झाली तेव्हा हॉस्पिटलचे संचालक नूर आलम यांनी तिला रात्रीही ड्युटी करण्यास सांगितले.

रात्री उशिरा ऑपरेटरसह चौघांनी मिळून नर्सवर बलात्कार केला. त्यानंतर गळ्यात दोरी बांधून तिला छताला लटकवले. सकाळच्या सुमारास नर्सचा लटकलेला मृतदेह पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी शिडी लावून मृतदेह खाली आणला.

नर्सच्या तोंडावर मास्क आणि हातात रुमाल होता. हा खून असल्याचा संशय पोलिस आणि स्थानिकांनी व्यक्त केला. ही माहिती नातेवाईकांपर्यंत पोहोचताच आई व इतरांनी हॉस्पिटल गाठले. आईने रुग्णालयाचा संचालक नूर आलम, चांद आलम, अनिल आणि एका अज्ञाताविरुद्ध बलात्कार आणि खुनाचा गुन्हा नोंदवला. एसपी दिनेश त्रिपाठी यांनी सांगितले की, बलात्कार आणि हत्येचा अहवाल लिहिला आहे. एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू आहे, तर उर्वरित तिघांचा पोलिस शोध घेत आहेत.