आमखोल गावची  जागृत काळेश्वरी माता पालखीत बसुन निघाली भक्तांच्या भेटीला...  

आमखोल गावची  जागृत काळेश्वरी माता पालखीत बसुन निघाली भक्तांच्या भेटीला...  

Pandharpur Live Online :

 
     हळूहळू वातावरणात बदलाचे वारे वेगाने वाहताना दिसतात, सर्वत्र उकाडा वाढताना जाणवत असताना, मार्च महिना ,अर्थातच माघ/फाल्गुन मासात आपल्या सर्व  कोकण वासीय बांधवांना वेध लागतात ते शिमगा म्हणजेच 'होळी' सणाचे  खरे पाहता म्हणजे शिमग्याची मजा आनंद हा कोकणा सारखा वेगळाच आपली ओळख सांगणारा, महत्त्वाचा सणात एक आगळावेगळा व आपली संस्कृती परंपरा जपण्याचा  पुरेपूर प्रयत्न आपला कोकणातील  बांधव जपत आलेला आहे. सध्या यावर्षी थोडेसे चित्र वेगळेसे दिसत असले,अनेक प्रसंग खुप काही अनुभवातून शिकवुन गेलेत.त्यात कोरोनाने आर्थिक चाकरमान्यांची होणारी विवंचना त्यातच एसटी संपामुळे गावी जाण्याचे होणारे शहरवासीयांचे हाल,त्यातच खाजगी वाहतुकीने प्रवास म्हणजे भरमसाठ तिकीट दरवाढ, अशा समस्या आ वासुन  सर्व कोकणवासीयांना सतावत आहेत. अशी जरी परिस्थिती असली,तरी कितीही कठीण काळ असला तरी आपला कोकण वासीय बांधव या सार्या परिस्थिती वर  मात करत  शिमगा सणाला जाणार म्हणजे जाणारच........!

      तर असा हा अपुला सर्वांना हवाहवासा वाटणारा  शिमगा होळीचा सण खुप काही आनंदाची पर्वणी घेवुन येतो .कोकणात दहा दिवस चालणारा होळीचा सण या दहा दिवसात  रात्रीच्या वेळी  दररोज होळी पेटवली जाते.पुजा अर्चा करून  होळी भोवती फेर धरून ग्रामदेवतेचे नामस्मरण केले जाते.

       अशी आमखोल गावची जाग्रुत माउली काळेश्वरी देवी, शंदकरनी देवी, मावळे भाचे राजा,व जाकमाता देवी,ग्रामस्थ व भाविकांचे श्रद्धास्थान व सर्व दुर ख्याती असणाऱ्या व ग्रामवासीयांच्या हाकेला धावणाऱ्या  माऊलीचे मंदिर आहे. पुरातन मंदिरात स्थानापन्न असलेल्या काळेश्वरी मातेचे मंदिर गावातील ग्रामस्थांनी आपल्या श्रमाने लोकवर्गणीतून, व देणगीरूपाने , नवीन मंदिराची उभारणी कमंदिराची उभारणी करून काळेश्वरी मातेच्या आशिर्वादाने  मंदिर बांधण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले. शिमगा सणात ग्रामदेवतेला पालखीत बसवुन वाजत गाजत भक्तांच्या भेटी ला आजुबाजुच्या गावात दर्शनासाठी नेली जाते. व यावेळी 'खेळी' अर्थात ग्रामदेवतेचे भक्त  यांचा उत्साह दांडगा असतो.अनवाणी चालत पालखी खांद्यावर नाचवत कसलीही तमा न बाळगता माउली च्या  भक्ती त दंग होणारे  भक्त खेळी भगवे निशाण मानाने मिरवत देवीची मिरवणूक पार पाडतात, आजुबाजुच्या गावातुन मिरवणूक पार पाडत शेवटी देवीची पालखी स नई  ढोलाच्या  तालात नाचवत  आपल्या गावात आणली जाते आणि गावात प्रत्येक घरातील व्यक्ती मातेचे दर्शन घेत माउलीचे आशिर्वाद घेत नवस , साकडे घालतात. यावेळी  मनसणारे पाटील देवीपुढे गार्हाणे सांगुन सुखी ठेवण्याचे देवीला विनवणी करतात.शेवटच्या दिवशी मोठा होम (होळी) पेटवली जाते. व रात्री बारा वाजता  होळी पेटवून फाग म्हणून झाल्यावर , होळी भोवती गोल सर्व  ग्रामस्थ बाळ गोपाळ फेर धरतात, यावेळी ग्रामदेवतेच्या पालखी लाही भक्ती भावात  नाचवले जाते. आणि दुसरा दिवस उजडतो तो म्हणजे 'रंगपंचमी 'चा या दिवशी सर्व बाळ गोपाळ लहान थोर एकमेकांना रंग लावत  रंगा प्रमाणे जिवनात रंग व एकतेचा ,बंधुतेचा संदेश या रंग पंचमीतुन देतात, व आनंदाने ग्रामदेवतेची पालखी सानेवर नेत वाजत गाजत सगळे एकत्र जमत हे क्षण आयुष्यात पुन्हा येण्याचे देवीकडुन आशिर्वाद घेत गुळखोबर्याची प्रसाद वाटत, एकमेकांना गुळालाची उधळण करत देवीची पालखी ग्रामदेवतेच्या मंदिरात नेली जाते. व यावेळी या सणाची सांगता केली जाते.

आजही कोकणातील आपले बांधव या सणाची अखंडता काळ जरी बदलत असला तरी आपली भक्ती, परंपरा, माऊली प्रती आपली श्रद्धा ,जपण्याचा प्रयत्न आपल्या पद्धतीने श्रद्धेने करतात. हेच या सणातुन आपल्याला जाणवते हे मात्र खरे नाही  का.....

सनी गणेश आडेकर, मुंबई