अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात ; सासू-सासऱ्यांनंतर पती, आई आणि मुलांनाही लागण

Pandharpur Live : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे कुटुंबही कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. याबाबत शिल्पा शेट्टी हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात ; सासू-सासऱ्यांनंतर पती, आई आणि मुलांनाही लागण

शिल्पा शेट्टी हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. 'मागील 10 दिवस आमच्या कुटुंबासाठी कठीण गेले. माझ्या सासू-सासरे कोरोना पॉझिटिव्ह झाले. त्यानंतर मुलगी समिशा, मुलगा वियान, माझी आणि शेवटी राज यालाही कोरोनाची लागण झाली. ते सर्व नियमांचे पालन करत असून होम आयसोलेट आहेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहेत', असे शिल्पा शेट्टी हिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.

तसेच घरामध्ये काम करणारे दोन कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. देवाच्या कृपेने सर्व जण बरे होत आहेत. माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. नियमानुसार आण्ही सर्व खबरदारी घेत असून तात्काळ मदतीसाठी बीएमसी आणि अधिकाऱ्यांचे आभार, असेही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

चाहत्यांचे मानले आभार

पोस्टमध्ये अखेरीस शिल्पा शेट्टी हिने या कठीण काळामध्ये पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच आमच्यासाठी प्रार्थना करा असे आवाहनही तिने केले आहे. यासह मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, सुरक्षित रहा आणि कोरोना पॉझिटिव्ह असा किंवा नसा… पण मानसिक रुपाने पॉझिटिव्ह रहा, असे आवाहन शिल्पा शेट्टी हिने केले.