जमिनीखाली लपवला होता 70 कोटींचा खजिना, पुन्हा खोदून पाहिले तेव्हा बसला धक्का

जमिनीखाली लपवला होता 70 कोटींचा खजिना, पुन्हा खोदून पाहिले तेव्हा बसला धक्का

Pandharpur Live Online :

मेलबर्न - एका ड्रग्स डिलरने जमिनीच्या आत तब्बल ७० कोटी रुपये किमतीचे ड्रग्स लपवून ठेवले होते. मात्र याची पोलिसांना कुणकुण लागली. त्यानंतर जेव्हा हा ड्रग्स डिलर लपवलेले ड्रग्स तिथून काढण्यासाठी पोहोचला पोलीसही लपून तिथे पोहोचले.

मात्र संबंधित जागेवर खोदकाम केलं तेव्हा तिथे त्याला काहीच मिळालं नाही. पोलिसांनी ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली. त्यानंतर संबंधित आरोपीला अटक केली.

हे प्रकरण २५ वर्षीय क्रिश्चियन ताचेव्हशी संबंधित आहे. तो स्वत: एक पर्सनल ट्रेनर असल्याची बतावणी करायचा. मात्र तो ऑस्ट्रेलियातील ड्रग्स पुरवठ्यामध्ये कुरियरचं काम करत असे. ६ एप्रिल २०२२ रोजी कोर्टाने या व्यक्तीला दोषी ठरवले.

क्रिश्चियन, पोलिसांची नजर चुकवून पैशांनी भरलेल्या बॅगा आणि ड्रग्सची एका जागेवरून दुसरीकडे ट्रान्सपोर्ट करायचा. मात्र काही काळापासून पोलिसांची त्याच्यावर नजर होती. अखेर पोलिसांना ते लोकेशन ट्रेस करण्यात यश मिळालं जिथे क्रिश्चियन याने मोठ्या प्रमाणावर ड्रग्स लपवून ठेवले होते. त्याची किंमत ५६ ते ७० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी याची माहिती नारकोटिक्सला दिली. त्यानंतरया ड्रग्स डिलरला रंगेहात पकडण्यासाठी कॅमेरा लावला. १९ मार्च २०२१ रोजी क्रिश्चियन ते ड्रग्स काढण्यासाठी तिथे पोहोचला. त्याने २५ मिनिटांपर्यंत खोदकाम केले. मात्र त्याला तिथे काहीच मिळाले नाही. पोलिसांनी तेथील ड्रग्स आधीच काढून नेले याची त्याला कल्पनाही नव्हती.

त्यानंतर काही वेळाने त्याला खूप पैशांसह ताब्यात घेण्यात आले. तसेच प्रकरण कोर्टात गेले. तिथे ६ एप्रिल २०२२ रोजी झालेल्या सुनावणीत कोर्टाने ड्रग्सच्या तस्करीमध्ये त्याला दोषी ठरवले. तसेच त्याला ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच हा गुन्हा खूप गंभीर असल्याचेही न्यायमूर्तींनी नमूद केले.