अशी ही लगीनघाई ! : कोरोनाबाधित नवरदेवाच्या गळ्यात पीपीई कीट घालून नवरीने हॉस्पीटल मध्येच घातली वरमाला

Pandharpur Live Oline : अलाप्पुझा 26 एप्रिल : कोरोना महामारीमुळे देशभरात चिंतेच वातावरण आहे. दररोज वाढती रुग्णसंख्या आणि मृतांच्या आकड्यांमुळे हैराण असणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर केरळमधील एका अनोख्या लग्नामुळे स्मित हास्य आलं आहे. केरळच्या एका मेडिकल कॉलेजमध्ये एक अनोखा विवाहसोहळा पार पडला आहे. या लग्नात पीपीई किट घालून डॉक्टर आणि उपस्थित सर्व वराती बनले तर मेडिकल कॉलेजचा परिसर लग्नाचा मंडप.

अशी ही लगीनघाई ! : कोरोनाबाधित नवरदेवाच्या गळ्यात पीपीई कीट घालून नवरीने हॉस्पीटल मध्येच घातली वरमाला

केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यात राहाणाऱ्या एका तरुणाचं आणि तरुणीचं लग्न ठरलं होतं. मात्र, लग्नाच्या काही दिवस आधीच नवरदेवाला कोरोनाची लागण झाली. 

यानंतर नवरदेवाला अलाप्पुझा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. ठरलेल्या वेळेवरच हे लग्न पार पडावं यासाठी नवरीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे लग्नासाठी परवानगी मागितली. जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील मेडिकल कॉलेजमध्येच दोघांच्या विवाहास परवानगी दिली.

लग्न ठरलेल्या दिवशीच करायचं ही नवरीची इच्छा आता पूर्ण होणार होती. त्यामुळे, रविवारी ही नवरीबाई पीपीई किट घालून रुग्णालयात पोहोचली.

रुग्णालयातच पीपीई किट घातलेला स्टाफ या लग्नाचा साक्षीदार बनला. यानंतर पीपीई कीटमधील नवरीबाई आणि कोरोनाबाधित नवरदेवानं एकमेकांना वरमाळा घातली आणि पारंपारिक पद्धतीनं हा विवाहसोहळा पार पडला. कोरोना संकटाच्या काळात काही दिलासादायक बातम्याची समोर येत आहेत. ज्यामुळे चिंतेत असणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य खुलत आहे, ही बातमीदेखील अशीच आहे.