गोष्ट एका ऑनलाईन लग्नाची! पुण्यात पार पडले हायटेक ऑनलाईन लग्न!

Pandharpur Live Online: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या दोन तासांच्या आत लग्नसोहळा उरकण्याची आणि केवळ 25 नातेवाईकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. मात्र त्यातूनही मार्ग काढत पुण्यात रंगलेल्या हायटेक लग्नाची सध्या चर्चा आहे. या लग्नाला झूम मिटींग ॲपद्वारे तब्बल 100 जणांची उपस्थिती होती. प्रशासनाने आखून दिलेल्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करता या नवदांपत्याने तंत्रज्ञानाची मदत घेत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

गोष्ट एका ऑनलाईन लग्नाची! पुण्यात पार पडले हायटेक ऑनलाईन लग्न!
प्रतिकात्मक छायाचित्र

पुण्यातील केशव विध्वंस आणि प्रियंका कोडीलकर हे दोघेजण कॉलेजमध्ये असताना एकमेकांच्या प्रेमात पडले आणि पुढे त्यांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांचा साखरपुडा केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत पार पडला. आपल्या लग्नाला किमान 100 जणांची उपस्थिती असावी अशी त्यांची इच्छा होती. कारण एका नातेवाईकाला बोलावले तर दुसरा नाराज होईल अशी त्यांना भीती होती. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या कडक निर्बंधांमुळे हे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी शक्कल लढवत त्यातूनही मार्ग काढला आहे.

केशव आणि प्रियंकाच्या लग्नाचे सर्व विधी घरच्या घरी उरकले. एवढेच नव्हे तर झूम मीटिंगद्वारे त्यांच्या लग्नाला 25 किंवा 50 नाही तर तब्बल 100 नातेवाईकांनी आणि मित्रपरिवाराने उपस्थिती लावली. अनेकांनी त्यांच्या आयडियाच्या कल्पनेचे काwतुक केले असून या नवदांपत्याला नवीन आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.