पञकार संतोष रणदिवे यांना कोविड योध्दा पुरस्कार

पंढरपूर येथील दै.तरुण भारत संवादचे पञकार संतोष रणदिवे यांना कोविड योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंढरपूर ग्रमीण पोलिस ठाण्याचे पो.नि.प्रशांत भस्मे, संस्थापक अध्यक्ष समाधान सुरवसे यांच्या हस्ते गुलाबपुष्प, सन्मानपञ देऊन गौरविण्यात आले.

पञकार संतोष रणदिवे यांना कोविड योध्दा पुरस्कार
वार्ताहर पंढरपूर
       कोरोनाच्या संकटापासून दूर ठेवण्यासाठी लोकांना जागृत व योग्य, उपयुक्त माहिती पाठविण्याचे काम विविध क्षेञातील लोकांनी केले आहे. कार्याची दखल घेत छावा क्षाञवीर सेना,महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पंढरपूर येथील दै.तरुण भारत संवादचे पञकार संतोष रणदिवे यांना कोविड योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंढरपूर ग्रमीण पोलिस ठाण्याचे पो.नि.प्रशांत भस्मे, संस्थापक अध्यक्ष समाधान सुरवसे यांच्या हस्ते गुलाबपुष्प, सन्मानपञ देऊन गौरविण्यात आले.
     संतोष रणदिवे यांनी कोरोना कालावधीत शेतकरी, व्यापारी, कामगार, कोरोना रुग्ण यांच्याविषयीच्या समस्या सरकार व प्रशासनाकडे बातमीच्या स्वरुपात मांडल्या. तर रुग्णालयातील कमतरता, आरोग्य विभागाकडून करण्यात येणा-या उपाययोजना, सुविधा यासंदर्भात माहिती देण्याचे त्यांनी काम केले आहे. याच कार्याची दखल छावा क्षाञवीर सेनेकडून घेण्यात आली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष सतिश सौदागर, विद्यार्थी प्रदेश कार्याध्यक्ष विजय कदम, वारकरी प्रदेश कार्याध्यक्ष अच्युत गुरव, जिल्हा संपर्क प्रमुख गणेश चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष नौशाद शिकलकर आदी उपस्थित होते.