महाराष्ट्राच्या 'या' विभागासह गोव्यात पावसाचा इशारा

Pandharpur Live Online: बिहार ते तामिळनाडू दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून मंगळवार पासून ते येत्या शुक्रवारपर्यंत मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि गोव्यात मेघगर्जना, वीजांचा कडकडाटात होणार आहे. तर काही ठिकाणी पाऊसही पडणार आहे.

महाराष्ट्राच्या 'या' विभागासह गोव्यात पावसाचा इशारा

तसेच काही भागात सोसाट्याचा वाराही वाहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने सोमवारी वर्तविला. मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात कमाल आणि किमान तपमानात वाढ झाली आहे. परिणामी सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढली आहे. उकाड्याने नागरिक हैराण होत आहेत. काल  सकाळपासूनच सर्वत्र ऊन पडले होते. उकाडाही तीव्रतेने जाणवत होता.

सायंकाळी मात्र मेघगर्जना झाली, मात्र रात्री उशीरापर्यंत पावसाने हजेरी लावली नाही. मागील 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला.

कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे होते. राज्यात ब्रम्हपुरी येथे उच्चांकी 43.3 अंश कमाल तपमानाची नोंद झाली. गुरूवारपर्यंत सर्वत्र मेघगर्जना, वीजांचा कडकडाट होणार आहे.

काही ठिकाणी सोसाट्याचा वाराही वाहणार आहे. शुक्रवारी मात्र राज्यात बहुतांश ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.