गावांच्या नावापुढे 'खुर्द' आणि 'बुद्रूक' का जोडले जाते? जाणून घ्या, नेमकी काय आहे यामागची भानगड!

Pandharpur Live Online : महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी खुर्द आणि बुद्रुक असे शब्द गावांच्या नावापुढे दिसतात. संगमनेर खुर्द किंवा संगमनेर बुद्रुक, तसेच आंबेगाव खुर्द आणि आंबेगाव बुद्रुक किंवा वडगाव खुर्द आणि वडगाव बुद्रुक अशी दोन दोन गावे शेजारी शेजारी वसलेली दिसतात.आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक गावे आहेत ज्यांच्या नावाअगोदर बुद्रुक व खुर्द लावलेले असते. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की अरेच्या ही बुद्रुक आणि खुर्द ही काय भानगड आहे. चला तर मग आज आपण जाणून घेऊयात बुद्रुक आणि खुर्द यांचा इतिहास.

गावांच्या नावापुढे 'खुर्द' आणि 'बुद्रूक' का जोडले जाते? जाणून घ्या, नेमकी काय आहे यामागची भानगड!

शिवकाळापुर्वी आपल्या महाराष्ट्रात इस्लामी भाषेचा व सत्तेचा खुप मोठा अमल होता, त्यामुळे सगळीकडे उर्दू मिश्रित किंवा फारशी मिश्रित भाषा बोलली जायची. आदिलशाही, कुतुबशाही व मोघल यांच्या अमलात असलेल्या प्रदेशात बुद्रुक व खुर्द हे शब्द वापरले जायचे.

एखाद्या रस्त्यामुळे किंवा नदी अथवा ओढ्यामुळे एखाद्या गावाचे जर दोन भाग पडत असतील तर ते भाग समसमान कधीच नसायचे, एक भाग छोटा असायचा व एक गाव मोठा असायचा.
 
त्यातील मोठ्या भागाला बुजुर्ग व छोट्या भागाला खुर्द म्हटले गेले, बुजुर्ग म्हणजे मोठा आणि खुर्द म्हणजे छोटा. पुढे बुजुर्ग ह्या शब्दाचा अपभ्रंश होऊन बुद्रुक हा शब्द प्रचलित झाला व आज आपल्याला अनेक गावांच्या सुरवातीला बुद्रुक व खुर्द हे शब्द लागल्याचे दिसून येते.

शासकीय नियमानुसार बुद्रुक म्हणजे जुने गाव आणि खुर्द म्हणजे नवे गाव होय. शिवकालीनपूर्व महाराष्ट्रात मुस्लीम भाषेचा आणि इस्लामी सत्तेचा अंमल होता. तेव्हा उर्दू मिश्रित किंवा पारसी मिश्रित भाषा बोलली जायची. मोगलशाही, आदिलशाही, कुतुबशाही आणि निजामशाही या कालखंडामध्ये गावांसाठी खुर्द आणि बुद्रुक हे शब्द वापरले जात होते.

गावांच्या नावांपुढे खुर्द आणि बुद्रुक लिहिण्याचा इतिहास खूप मजेशीर आहे. एखाद्या रस्त्यामुळे किंवा नदी, ओढ्यामुळे एका गावाचे दोन भाग पडत असतील तर, ते दोन भाग कधीच समसमान नसतात. यातला एक भाग छोटा तर दुसरा भाग मोठा असतो. यातील गावाचा मोठा भाग असलेल्या भागाला बुजुर्ग आणि छोटा भाग असलेल्या भागाला खुर्द असे म्हणतात. बुजुर्ग म्हणजे मोठा आणि खुर्द म्हणजे छोटा चिल्लर अशा अर्थ मानला जायचा. म्हणून अशा विभागलेल्या दोन गावांना त्यांच्या भागांना खुर्द किंवा बुद्रुक असले म्हटले जाते. या बुजुर्गचा अपभ्रंश होवून बुद्रुक हा शब्द तयार झाला आणि खुर्द हा शब्द तसाच राहिला.