समजून घ्या :  सात बँकांचे आय.एफ.एस.सी. (I.F.S.C.) कोड १ एप्रिलपासून बदलणार ; खातेदारांना काय करावं लागणार ?

बँकाच्या विलनीकरणानंतर अनेक बँकांचे चेकबुक, पासबुक आणि आय.एफ.एस.सी. कोडमध्ये मोठे बदल होणार आहेत. 

समजून घ्या :  सात बँकांचे आय.एफ.एस.सी. (I.F.S.C.) कोड १ एप्रिलपासून बदलणार ; खातेदारांना काय करावं लागणार ?

..................

बारामती ऑरगॅनिक्स प्रस्तुत दत्तसाई ऑरगॅनिक्स् अ‍ॅन्ड हर्बल प्रॉडक्ट एकाच ठिकाणी विना रसायन आणि नैसर्गिक पध्दतीने पिकवलेली सेंद्रिय उत्पादने! संपर्क :- पत्ता : अर्बन बँक प्रशासकीय इमारती शेजारी, नवी पेठ, पंढरपूर मोबाईल : 9028592324, 7798992630

................................


एक एप्रिलनंतर देशातील सात बँकांच्या ग्राहकांना दैनंदिन बँक व्यवहारांमध्ये या बदलाचा परिणाम जाणवू शकतो. 
एक एप्रिल २०२१ पासून अनेक बँकांची जुने चेकबुक आणि आय.एफ.एस.सी. कोड निष्क्रीय होणार आहेत. 
त्यामुळे या सात बँकांमध्ये खाती असणाऱ्या ग्राहकांनी बँकेत फोन करुन आपला नवीन कोड जाणून घेणं फायद्याचं ठरु शकतं. 


बदलेला कोड ठाऊक असल्यास ऑनलाइन व्यवहार करताना ग्राहकांना काही अडचणी येणार नाहीत. 
देना बँक, विजया बँक, कॉर्पोरेशन बँक, आंध्रा बँक, ओऱिएंटल बँक ऑफ कॉमर्स, यूनायटेड बँक आणि इलाहाबाद बँकेच्या ग्राहकांना एक एप्रिलपासून होणाऱ्या या बदलांचा फटका बसू शकतो. 
जर या सता बँकांपैकी कोणत्याही बँकेमध्ये खातं असणाऱ्या ग्राहकांनी त्यांच्या बँक शाखेशी संपर्क करुन नव्या चेकबुक आणि आय.एफ.एस.सी. कोडसंदर्भात माहिती घेणं फायद्याचं ठरेल. 

समजून घ्या : 

अनेक बँकांमध्ये वापरात नसणारी सेव्हींग अकाऊंट्स (Saving Accounts) असल्यास बसू शकतो आर्थिक फटका https://t.co/Wv26iXk4UM जाणून घ्या काय सांगतात बँकांचे नियम आणि एकाहून अधिक सेव्हिंग अकाऊंट्स कशापद्धतीने तोट्याची ठरु शकतात
 एक एप्रिल २०२० पासून सरकारने देशातील तीन बँकांच्या विलनीकरणाचा निर्णय घेतला आहे. 
यामध्ये पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटर बँक ऑफ कॉमर्स आणि यूनायटेड बँक ऑफ इंडियाच्या विलनीकरण होणार आहे. त्याचबरोबर विजया बँकेचं विलनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झालं असून हा बदल एक एप्रिलपासून लागू होणार आहे. 
त्याचबरोबर सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत तर आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक यूनियन बँके ऑफ इंडियामध्ये विलीन होणार आहे.