सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची बातमी ! मुंबई पुण्याहून महाराष्ट्राच्या 'या' मोठ्या शहरात जाणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द !!

Pandharpur Live: महाराष्ट्रात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. दररोज किमान ६० हजारांहून नवीन रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात सध्या संचारबंदी असल्याने घराबाहेर पडणाऱ्यांची संख्यासुद्धा कमी झालेली आहे. याचा विपरीत परिणाम रेल्वे सेवेवर झाला असल्याने मध्य रेल्वेने काही शहरातील रेल्वे रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

सुमारे 10 प्रवासी गाड्या 10 मेपर्यंत रद्द करण्यात आल्यात. विशेष म्हणजे मुंबई आणि पुण्यातून राज्यातील विविध जिल्ह्यांत जाणाऱ्या या गाड्या रद्द करण्यात आल्यानं चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात या गाड्यांमध्ये प्रवासी कमी असल्यानं या गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय. 

या रेल्वे गाड्या रद्द!

मनमाड -मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, जालना - मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, अजनी- मुंबई हमसफर/ दुरंतो एक्स्प्रेस, नागपूर - पुणे, दादर -शिर्डी साईनगर एक्स्प्रेस अशा गाड्या रद्द करण्यात आल्यात. गाड्या तोट्यात चालत असल्याने रद्द करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकही रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलंय.

या विशेष रेल्वे गाड्या रद्द

खालील विशेष रेल्वेगाड्या कमी प्रतिसादामुळे रद्द करण्यात आल्या आहेत.

1).ट्रेन क्रमांक 02109 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मनमाड विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द
2) ट्रेन क्रमांक 02110 मनमाड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द
3).ट्रेन क्रमांक 02113 पुणे -नागपूर विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द
4).ट्रेन क्रमांक 02114 नागपूर -पुणे विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 09.05.2021 पर्यंत रद्द
5).ट्रेन क्रमांक 02189 मुंबई -नागपूर विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 11.05.2021 पर्यंत रद्द
6)ट्रेन क्रमांक 02190 नागपूर -मुंबई विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द
7) ट्रेन क्रमांक 02111 मुंबई -अमरावती विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 11.05.2021 पर्यंत रद्द
8) ट्रेन क्रमांक 02112 अमरावती मुंबई विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द
9) ट्रेन क्रमांक 02271 मुंबई -जालना विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द
10) ट्रेन क्रमांक 02272 जालना -मुंबई विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 11.05.2021 पर्यंत रद्द