राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप मांडवे यांचेकडून पत्रकार बांधवांना ‘दिवाळी भेट’

पंढरपूर (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीपदादा मांडवे यांचे वतीने आज पंढरपूरमधील पत्रकार बांधवांना दिवाळीनिमित्त भेटवस्तु देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. आज पत्रकार भवनमध्ये हा कार्यक्रम संपन्न

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप मांडवे यांचेकडून पत्रकार बांधवांना ‘दिवाळी भेट’


‘‘राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष  संदीप मांडवे यांच्याकडून पत्रकार बांधवांना सन्मानपुर्वक दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याबद्दल व पत्रकारांची दिवाळी गोड केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. यावर्षी प्रथमच पंढरीतील पत्रकार बांधवांना अशा पध्दतीने एकत्रीत बोलावुन राजकीय क्षेत्रातील व्यक्तीकडून अशा प्रकारे सन्मानपुर्वक दिवाळीच्या निमित्त शुभेच्छा देण्यात येत आहेत, ही निश्‍चितच आम्हा पत्रकार बांधवांसाठी आनंदाची बाब आहे. असे मत यावेळी बोलताना पत्रकार संरक्षण समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे यांनी व्यक्त केले व संदीप मांडवे यांच्या पुढील यशस्वी राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

पंढरपूर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांनी संदीप मांडवे यांच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्याचे कौतुक केले. तसेच अशा पध्दतीचा पत्रकार बांधवांसाठी अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

कोरोनाच्या संकटकाळातही आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र आपले कर्तव्य चोख बजावणार्‍या पत्रकार बांधवांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्याची ईच्छा होती. त्यानुसार आज ‘फुल ना फुलाची पाकळी’ अशी ही मिठाई व भेटवस्तु आज यथाशक्ती देत असल्याचे मत संदीप मांडवे यांनी व्यक्त केले.

यावेळी राधेश बादले पाटील महाराज, राष्ट्रवादी शहर संघटक विजय मोरे, सुहास म्हमाने, ओंकार चव्हाण, आजिनाथ जाधव, आनंद जमदाडे, माऊली कुलकर्णी, सागर कावरे, विशाल डोंगरे, आनंद कथले, रविंद्र आटपाडकर, प्रविण यादव, संतोष पाटील व अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.