काव्यतरंग - चिमुकले हास्य तुझे टपो-या थेंबात....

'काव्यतरंग' या पंढरपूर लाईव्ह च्या विशेष सदरामध्ये लातूर येथील कवयित्री नयन भादुले-राजमाने यांची मायलेकीच्या नात्यातली माया दर्शविणारी कविता.

काव्यतरंग - चिमुकले हास्य तुझे टपो-या थेंबात....

थेंबाचा नाद घुमे

खोल कानात

बाळा नको खेळू 

अशा धुंद पावसात

नाद तुझ्या पैंजणाचा

घुमतो कानात

विसरले भान जणू

तुझ्या हुंदडण्यात

चिमुकले हास्य तुझे

टपो-या थेंबात

नभातूनी खट्याळ

करी बरसात

गंधाळली झाडे-वेली

व्याकुळले मन

हिरव्यागार धरणीवर

पहुडले मन

                 - नयन भादुले-राजमाने, लातूर

                      ८८०५४२६०७१