लॉकडाऊन जाहीर झाला तर महागाईचा भडका उडेल! भारतीय रिझर्व्ह बँकेचा गंभीर इशारा

Pandharpur Live Online: कोरोनाचे संकट असेच वाढत राहिले आणि देशात लॉकडाऊन जाहीर झाला तर त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर पडेल आणि महागाईचा भडका उडेल! असा गंभीर इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दिलाय.

लॉकडाऊन जाहीर झाला तर महागाईचा भडका उडेल! भारतीय रिझर्व्ह बँकेचा गंभीर इशारा

मुंबई : भारतात कोरोनाची दुसरी लाट सध्या नियंत्रणात येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. सतत वाढत असलेल्या रुग्णसंख्येवरून चिंतानजक परिस्थिती निर्माण झाली असतानाच भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) गंभीर इशारा दिला आहे.

कोरोनाचे संकट असेच वाढत राहिले आणि देशात लॉकडाऊन जाहीर झाला तर त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर पडेल आणि महागाई वाढेल.

कोरोनावर वेळीच नियंत्रण न मिळविल्यास वस्तूंच्या पुरवठ्यावर प्रतिबंध लादले जाण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर होईल आणि जर देशात पुरवठा साखळी खंडित झाली तर इंधन महागाईत वाढ होईल आणि त्यामुळे देशात महागाईतही वाढ होण्याचा संभाव्य धोका असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

आरबीआयच्या ग्राहक निर्देशांकानुसार मार्च महिन्यात महागाईत ५.५ टक्के वाढ झाली असून फेब्रुवारीत ती ५ टक्के होती. खाद्य आणि इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे महागाईत वाढ झाल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

अनेक राज्यात लॉकडाऊनसह अन्य निर्बंध लादण्यात आल्याने अनिश्चिततेचे वातावरण आहे. राजधानी दिल्लीत १५ दिवसापासून तर महाराष्ट्रातही लॉकडाऊनमुळे पुरवठा साखळी खंडित झाली आहे. अनेक राज्यात स्थानीय स्तरावरही निर्बंध असल्याने त्याचाही परिणाम आर्थिक व्यवहारावर होत आहे