उद्योजक अभिजीत पाटील नुसतं बोलत नाहीत तर थेट करूनच दाखवतात! याची प्रचिती पुन्हा आली! पंढरीत स्वखर्चाने उभारले सुसज्ज कोविड हॉस्पिटल

Pandharpur Live : अशा आणिबाणीच्या काळात तालुक्यातील सामाजिक कार्यासाठी सदैव तत्पर अशी ओळख असलेले धारशिव साखर कारखाना चेअरमन अभिजीत पाटील यांनी माणुसकी जपत स्वतःच्या मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये स्वखर्चाने कोविड हॉस्पिटल उभारून चक्क ५० रुग्णांच्या उपचारासाठी सोय उपलब्ध करून देत आहेत. यामध्ये ५० बेडला ॲक्सिजनची सोय आसेल, मेडिकल, लॅब, तज्ञ डॅाक्टर कडुन उपचार, २४ तास डॅाक्टर्स, नर्स, स्वच्छता, पेशन्ट जेवणाची सोय सर्व सोयी सुविधांचा हजारो लोकांना फायदा होणार आहे. 

उद्योजक अभिजीत पाटील नुसतं बोलत नाहीत तर थेट करूनच दाखवतात! याची प्रचिती पुन्हा आली!  पंढरीत स्वखर्चाने उभारले सुसज्ज कोविड हॉस्पिटल

निवडणुक काळात मोठमोठया आश्वासनांची खैरात करणारे आणि नंतर दिलेली आश्वासनं गुलाल अंगावर पडताच सपशेल विसरणारे अनेक राजकीय नेते या महाराष्ट्रानं पाहिली असतील. पण पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचं एक उदयोन्मुख युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं ते उद्योजक अभिजीत उर्फ आबासाहेब पाटील पाटील यांनी आजतागायत आश्वासनं देण्यापेक्षा थेट कृती करण्यावरंच भर दिलेला आढळतो. आता पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीनंतर पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात झालेल्या कोरोनाच्या उद्रेकातून येथील जनतेला सावरायलाही अभिजीत पाटील तत्परतेने सरसावले आहेत. ते बोलले काहीच नाहीत तर थेट आपल्या डीव्हीपी मल्टिप्लेक्स थिएटरमध्येच त्यांनी सर्व सुविधांनी युक्त असे सुसज्ज कोविड हॉस्पिटल स्वखर्चाने उभे केलेय. कोणतीही मोठी राजकीय यंत्रणा व शक्ती पाठीशी नसूनही स्वेच्छेने त्यांनी केलेल्या या महान कार्याचं सर्वत्र मोठं कौतुक होत आहे.

सध्या राज्यभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दररोज हजारो रुग्ण सोलापूर जिल्ह्यात आढळून येत आहे. यात प्रामुख्याने पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रुग्णांची संख्या सर्वाधिक व लक्षणीय आहे. कोरोनाग्रस्तांच्या या वाढत्या संख्येमुळे सध्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत असून कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी रुग्णालयांची व बेडची कमतरता भासत आहे. 

अशा आणिबाणीच्या काळात तालुक्यातील सामाजिक कार्यासाठी सदैव तत्पर अशी ओळख असलेले धारशिव साखर कारखाना चेअरमन अभिजीत पाटील यांनी माणुसकी जपत स्वतःच्या मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये स्वखर्चाने कोविड हॉस्पिटल उभारून चक्क ५० रुग्णांच्या उपचारासाठी सोय उपलब्ध करून देत आहेत.
यामध्ये ५० बेडला ॲक्सिजनची सोय आसेल, मेडिकल, लॅब, तज्ञ डॅाक्टर कडुन उपचार, २४ तास डॅाक्टर्स, नर्स, स्वच्छता, पेशन्ट जेवणाची सोय सर्व सोयी सुविधांचा हजारो लोकांना फायदा होणार आहे. 

सध्या पंढरपूर व मंगळवेढा ह्या दोन्ही तालुक्यात कोरोनामुळे स्थिती अतिशय गंभीर बनली आहे. आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याने अनेक रुग्णांना ऑक्सिजनचे हॅास्पिटल उपलब्ध होत नसल्याने दगावत आहेत.त्यामुळे तातडीने उपचारासाठी अधिक रुग्णालये उभारणीची गरज निर्माण झाली असताना अभिजीत पाटील यांनी त्यांच्या मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये कोविड रुग्णालय उभारून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. गतवर्षीच्या कोरोनाच्या सुरवातीच्या काळापासून सर्वप्रकारची मदत करत अभिजीत पाटील यांनी आपले सामाजिक भान जपले आहे. गेल्या वर्षात कोरोनाकाळात पोलीस,आरोग्य कर्मचारी,तसेच पत्रकार बांधवांना हजारो कोरोना योध्यांना मोफत जेवण,विविध गरजू घटकांना वस्तू वाटप केले. घरोघरी जाऊन थर्मल स्कॅनिंग करीत होते, मुख्यमंत्री सहाय्यता निधी यासह अनेक प्रकारे अभिजीत पाटील यांनी मदत केली आहे. तसेच दोनच दिवसांपूर्वी रुग्णालयांची ऑक्सिजन कमतरता भरून काढण्यासाठी आपल्या साखर कारखान्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिल्या पायलट ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची घोषणा केली आहे. त्यासोबतच त्यांनी कोविड हॉस्पिटलची निर्मिती करून हजारो गोरगरीब लोकांना अशा अडचणीच्या काळात मोठा आधार दिल्याने व कोणत्याही पक्षात सामील नसताना व कोणताही मोठा राजकिय वरदहस्त नसताना केवळ लोकसेवेसाठी त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

आपण काही लोकांचे प्राण वाचवू शकतो या जाणिवेतून हे हॉस्पिटल जनतेच्या सेवेत समर्पित - अभिजीत पाटील 

"आम्हाला बेड मिळेल का? म्हणून दररोज अनेकजण भेटायला येतात तसेच अनेकांचे कॉल येतात.सोलापूर जिल्हा व जिल्हा बाहेरील हाॅस्पिटलांशी संपर्क करून शक्य तितक्या रुग्णालयांची बेडची व्यवस्था करून देतोय. मात्र वाढत्या रुग्ण संख्येमुळे यंत्रणा अपुरी पडत असल्याने सर्वांना बेड मिळणे शक्य नाही. त्यातून होणारी गरजू व गरिबांची तडफड पाहवत नव्हती.याच जाणिवेतून आपण काही लोकांचे प्राण वाचवू शकतो.यासाठी मी हे रुग्णालय सुरू करून लोकांच्या सेवेत समर्पित करत आहे. आपल्याला शक्य असेल तेवढी मदत सर्वांनी करायला अशा काळात करणे गरजेचे आहे."