आशिकी फेम राहुल रॉय ला ब्रेन स्ट्रोकचा झटका...

Pandharpur Live Online: ९०च्या दशकात प्रदर्शित झालेल्या आशिकी या चित्रपटामुळे एका रात्रीत सुपरस्टार झालेल्या राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला आहे. राहुल रॉय सध्या आपल्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होता. परंतु चित्रीकरणादरम्यानच त्याची अचानक तब्येत बिघडली. त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन दिवसांपूर्वीच त्याला हा झटका आला असून तेव्हांच त्याला नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आशिकी फेम राहुल रॉय ला ब्रेन स्ट्रोकचा झटका...

९०च्या दशकात प्रदर्शित झालेल्या आशिकी या चित्रपटामुळे एका रात्रीत सुपरस्टार झालेल्या राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला आहे. राहुल रॉय सध्या आपल्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होता. परंतु चित्रीकरणादरम्यानच त्याची अचानक तब्येत बिघडली. त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन दिवसांपूर्वीच त्याला हा झटका आला असून तेव्हांच त्याला नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

५२ वर्षीय राहुल रॉयला सध्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्याला प्रोग्रेसिव्ह ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून उपचारांनाही तो योग्य प्रतिसाद देत असल्याचं म्हटलं जात आहे.

मोठ्या कालावधीनंतर राहुल रॉय नव्या चित्रपटाद्वारे पुन्हा पदार्पण करणार होता. त्याच्या प्रकृतीसाठी त्याच्या चाहत्यांकडूनही प्रार्थना केली जात आहे.

राहुल रॉयनं १९९०मध्ये आशिकी या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली. त्या चित्रपटानंतर राहुल रॉयला मोठी ओळखही मिळाली. त्यानंतर राहुलनं तब्बल ४७ चित्रपट साईन केले. परंतु हळूहळू राहुल रॉय लाईमलाईटपासून दूर होत गेला. त्यानंतर बिग बॉसच्या पहिल्या पर्वाचंही विजेतेपद मिळवून तो पुन्हा चर्चेत आला होता.