पंढरपूर सिंहगड मध्ये "सॉफ्टवेअर टेस्टिंग (मॅन्युअल)" या विषयावर ऑनलाईन वेबिनार संपन्न

Pandharpur Live: पंढरपूर: प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागात "सॉफ्टवेअर टेस्टिंग (मॅन्युअल)" या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आले होते. हे वेबिनार मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

पंढरपूर सिंहगड मध्ये "सॉफ्टवेअर टेस्टिंग (मॅन्युअल)" या विषयावर ऑनलाईन वेबिनार संपन्न
सिंहगड महाविद्यालयातील कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागातील "आय ई आय स्टुंडन्ट चाप्टर" च्या अंतर्गत संगणक विभागात शनिवार, दि.२४ एप्रिल २०२१ रोजी "सॉफ्टवेअर टेस्टिंग (मॅन्युअल)" या विषयावर प्रवीण कलुबर्मे, सॉफ्टवेअर टेस्ट इंजिनिअर, यांचे ऑनलाईन व्याख्यान झाले.


   आजच्या कोरोना च्या काळातही व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना या वेबिनारद्वारे "सॉफ्टवेअर मॅन्युअल टेस्टिंग" मधील मॅन्युअल टेस्टिंग, ब्लॅक बॉक्स टेस्टिंग, स्मोक टेस्टिंग, एपीआय टेस्टिंग इत्यादीचे ऑनलाइन मार्गदर्शन मिळाले, १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. तृतीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना त्यांचे प्रकल्प बनवताना तसेच पुढील करिअर साठी हे वेबिनार अतिशय उपयुक्त ठरेल असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी यावेळी व्यक्त केला.


महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. नामदेव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. रविंद्र टाकळीकर यांनी शिक्षक समन्वयक म्हणून काम पाहिले. ऑनलाईन सहभागी सर्व मान्यवरांचे आभार मानले.


    हे वेबिनार यशस्वी करण्यासाठी आय.ई.आय. स्टुडंट चाप्टर चे ऍडव्हायजर प्रा. सुभाष पिंगळे, समन्वयक प्रा. रविंद्र टाकळीकर आदींसह संगणक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.