पंढरपूर सिंहगडच्या १२ विद्यार्थ्यांची "आर एस बी ट्रान्समिशन" कंपनीत निवड

पंढरपूर: प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील १२ विद्यार्थांची "आर एस बी ट्रान्समिशन कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

पंढरपूर सिंहगडच्या १२ विद्यार्थ्यांची "आर एस बी ट्रान्समिशन" कंपनीत निवड

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण व अभ्यासपूर्ण अभियांत्रिकीचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी पंढरपूर सिंहगड हे अग्रेसर आहे. "आर एस बी ट्रान्समिशन" या कंपनीत महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील भीमाशंकर बबलाद, सागर कदम, नवनाथ लोंढे, अतुल मुसळे, महेश निकलजे, प्रसाद राऊत, प्रथमेश शिंदे, विक्रांत शिंदे, शुभम व्होनमाने, महेश विरकर, हनुमंत गोफने, राहुल कांबळे आदी विद्यार्थ्यांची पुणे येथील "आर एस बी ट्रान्समिशन कंपनीत मुलाखतीतून निवड करण्यात आली आहे.

ही कंपनी व्यावसायिक वाहन, प्रवासी कार, बांधकाम, शेती उपकरणे, विविध प्रकारची ऑटोमोटिव्ह आणि ऑफ हायवे उपकरणे यांच्याशी संबंधित आहे.

"आर एस बी ट्रान्समिशन" या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, प्लेसमेन्ट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ.अल्ताफ मुलाणी, प्रा. सोमनाथ कोळी, प्रा. अतुल कुलकर्णी, प्रा. भारत आदमिले, राजाराम राऊत आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.