सिंहगडच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागात पालक मेळावा

पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे द्वितीय,तृतीय, चतुर्थ वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यां साठी ऑनलाइन पालक मेळावा आयोजित केली होती. द्वितीय,तृतीय,चतुर्थ वर्ष अभियांत्रिकीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांsचा प्रगतीचा आढाव जाणून घेण्यासाठी मंगळवार दि. ६ एप्रिल २०२१ रोजी ऑनलाईन पद्धतीने पालकांचा मेळावा घेण्यात आला असुन हा पालक मेळावा मोठ्यात उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

सिंहगडच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागात पालक मेळावा

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन पालक मेळाव्यात विभाग प्रमुख प्रा. सुधा सुरवसे प्रास्ताविक करताना म्हणाल्या, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी दररोज ऑनलाईन, मायक्रोसॉफ्ट टिम्स च्या माध्यमातून अध्यापनाचे काम सुरू आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नेटवर्क प्राॅब्लेम निर्माण झाल्यास “मुडल साॅफ्टवेअरच्या” माध्यमातून लेक्चर  उपलब्ध करून दिले आहेत. ऑनलाईन पद्धतीने  टेस्ट घेण्यात आली आहे. त्या टेस्टचा निकाल पालकांना संदेश अथवा व्हॉटसप द्वारे पाठविण्यात आला आहे. अभ्यासक्रम वेळेत संपविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास संबंधित प्राध्यापकांशी संपर्क साधावा असे आवाहन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. सुधा सुरवसे यांनी ऑनलाईन पालक मेळाव्यात बोलताना केले.

बारामती ऑरगॅनिक्स प्रस्तुत दत्तसाई ऑरगॅनिक्स् अ‍ॅन्ड हर्बल प्रॉडक्ट एकाच ठिकाणी विना रसायन आणि नैसर्गिक पध्दतीने पिकवलेली सेंद्रिय उत्पादने! संपर्क :- पत्ता : अर्बन बँक प्रशासकीय इमारती शेजारी, नवी पेठ, पंढरपूर मोबाईल : 9028592324, 7798992630

......................


इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागात कार्यरत असलेले प्रा. अमोल जगदाळे पालकांना मार्गदर्शन करताना म्हणाले, विद्यार्थ्यांनी सतर्क राहून महाविद्यालय घेत असलेल्या प्रत्येक एँक्टीव्हीटी मध्ये सहभाग घेणे आवश्यक असुन पालकांनीही आपल्या पाल्याकडे लक्ष द्यावे. सध्या कोरोना संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या पॅटर्न नुसार परीक्षा घेत आहे. ऑनलाईन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास संबंधित शिक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी केले.


या पालक मेळाव्यात सहभागी झालेल्या पालकांनी शासनाच्या योजना होस्टेल, काॅलेज फी, शिष्यवृत्ती, ईबीसी, प्रकल्प सादरीकरण, परिक्षेचे स्वरूप या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, प्रा. सुधा सुरवसे यांनी उत्तरे दिली. या मेळाव्यात ४० हून अधिक पालकांनी सहभाग नोंदवला होता. ऑनलाईन सहभागी झालेल्या पालकांचे आभार प्रा. गणेश बिराजदार यांनी मानले.