पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकी पालक मेळावा संपन्न... ऑनलाईन पालक मेळाव्यातून विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी साधला संवाद

पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा प्रगतीचा आढाव जाणून घेण्यासाठी सोमवार दि. ५ एप्रिल २०२१ रोजी ऑनलाईन पद्धतीने पालकांचा मेळावा घेण्यात आला असुन हा पालक मेळावा मोठ्यात उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकी पालक मेळावा संपन्न... ऑनलाईन पालक मेळाव्यातून विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी साधला संवाद

महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन पालक मेळाव्यात प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम प्रास्ताविक करताना म्हणाले, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन नये यासाठी दररोज ऑनलाईन गुगल मिट च्या माध्यमातून लेक्चर घेण्याचे काम सुरू आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नेटवर्क प्राॅब्लेम निर्माण झाल्यास "मुडल साॅफ्टवेअरच्या" माध्यमातून लेक्चर नंतर उपलब्ध करून दिले आहेत. ऑनलाईन पद्धतीने दोन टेस्ट घेण्यात आल्या आहेत. त्या टेस्टचा निकाल पालकांना संदेश अथवा व्हटसप द्वारे पाठविण्यात आला आहे. अभ्यासक्रम वेळेत संपविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास महाविद्यालयातील प्राध्यापकांशी संपर्क साधावा असे आवाहन प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम यांनी ऑनलाईन मालक मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.

बारामती ऑरगॅनिक्स प्रस्तुत दत्तसाई ऑरगॅनिक्स् अ‍ॅन्ड हर्बल प्रॉडक्ट एकाच ठिकाणी विना रसायन आणि नैसर्गिक पध्दतीने पिकवलेली सेंद्रिय उत्पादने! संपर्क :- पत्ता : अर्बन बँक प्रशासकीय इमारती शेजारी, नवी पेठ, पंढरपूर मोबाईल : 9028592324, 7798992630

......................


    महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी पालकांना मार्गदर्शन करताना म्हणाले, विद्यार्थ्यांनी सतर्क राहून महाविद्यालय घेत असलेल्या प्रत्येक एँक्टीव्हीटी मध्ये सहभाग घेणे आवश्यक असुन पालकांनीही आपल्या पाल्याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी बोलताना व्यक्त केले.


    सद्या कोरोना संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या पॅटर्न नुसार परीक्षा घेत आहे. ऑनलाईन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास संबंधित शिक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी केले.


      या पालक मेळाव्यात सहभागी झालेल्या पालकांनी शासनाच्या योजना होस्टेल, काॅलेज फी, शिष्यवृत्ती, ईबीसी संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, प्रा. अनिल निकम यांनी उत्तरे दिली. या मेळाव्यात १२५ हून अधिक पालकांनी सहभाग नोंदवला होता. ऑनलाईन सहभागी झालेल्या पालकांचे आभार प्रा. अनिल निकम यांनी मानले.