कागदपञे सादर करण्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मुदत वाढ

पंढरपूर: प्रतिनिधी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या करिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया चालू आहे. कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक कार्यालयात कमी कर्मचाऱ्यांवर कार्यालयातील कामकाज चालू असुन या कार्यालयातील कमी कर्मचाऱ्यांचा फटका विद्यार्थ्यांना व पालकांना झाला. यामुळे वेळेत शैक्षणिक दाखले उपलब्ध न झाल्याने अभियांत्रिकीच्या प्रवेशापासून अनेक विद्यार्थी वंचित राहतील या भीतीपोटी पालकांतून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अभियांत्रिकीचा प्रवेश घेऊ इच्छुक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन नये यासाठी राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिया यांच्याकडून २० जानेवारी २०२१ पर्यंत विविध शैक्षणिक दाखले सादर करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली असल्याची माहिती पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी पञकारांना दिली.

कागदपञे सादर करण्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मुदत वाढ
सद्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरू असून या प्रवेश प्रक्रियेत नाॅनक्रिमेलेअर, ई. डब्ल्यू. एस. जातीचा दाखला तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र अशी विविध कागदपञे अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी सादर करण्यासाठी २० जानेवारी २०२१ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी पदवी व पदव्युत्तर प्रवेश निश्चित करते वेळेस आपल्या स्वतःच्या मुळ लाॅगिन मधुन ऑनलाईन प्रमाणात सादर करावेत. ही मुदत बुधवार दि. २० जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत असुन दाखलेऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहेत. विद्यार्थ्यांना वेळेत दाखले उपलब्ध झाले नाहीत अथवा ऑनलाईन दाखले अपलोड करून शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी प्रथम फेरीतील प्रवेश रद्द होईल आणि त्यांना खुल्या प्रवर्गातून दुसर्‍या फेरीत प्रवेश निश्चित होईल. अभियांत्रिकी प्रवेश घेऊ इच्छुक विद्यार्थ्यांना ई. डब्ल्यू. एस., एन. सी. एल. मुळ प्रमाणपत्र आणि जातीचा दाखला तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र मुळ ह्या कागदपञांची पावती ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया करते वेळेस सादर केली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मुदत वाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी www.mahacet.org या संकेतस्थळाला भेट दिल्या माहिती उपलब्ध होईल. अभियांत्रिकीच्या प्रवेशासंदर्भात माहिती साठी प्रा. सोमनाथ कोळी-८३७८०१७५४६, प्रा. उमेश घोलप-८०५५१०३७१५, प्रा. रविंद्र टाकळीकर-९७६५१०१५१०, प्रा. विक्रांत जुंदळे-९८२३७१७१८४ तसेच महाविद्यालयाच्या ०२१८६-२५०१४६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे.