स्वेरी अभियांत्रिकीच्या २३ विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी कंपनीमध्ये निवड

पंढरपूरः- येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कॅपजेमिनी’ या आंतरराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्हीवमधून स्वेरीच्या २३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.

स्वेरी अभियांत्रिकीच्या २३ विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी कंपनीमध्ये निवड

आंतरराष्ट्रीय कंपनी असलेल्या कॅपजेमिनी मध्ये स्वेरीच्या तब्बल २३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. कंपनीच्या निवड समितीने विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीतून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक अभ्यासाबरोबरच कमालीची शिस्त,आदरयुक्त संबंध व उत्कृष्ट शिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावित झाली. त्यांनी या निवड प्रक्रियेतून खुशाली चंद्रकांत राणेस्मिता भरत यादवसंध्याराणी दत्तात्रय टेकाळेअंजली महादेव यलसंगेप्राची अवधूत मानेआयेशा लालासाहेब मुलाणीश्वेता संजय विभुतेश्रद्धा सुहास तानवडेकांचन दीपक टोणपेसुकेशनी सत्यवान शिंदेआदिती आबासाहेब घावटेअश्विनी मधुकर देशमुखअश्विनी लक्ष्मण चव्हाणप्राजक्ता अशोक साठेसायली शामराव कोळीवृषाली राजेंद्र कोळीअश्विनी केरप्पा साळुंखेरोहित विष्णू नागटिळकसुरज सिद्धेश्वर अरडकपंकज औदुंबर शिंदेअभिनव आनंदअतुल कल्याणराव गुंड व आनंद गणपत माळी असे मिळून स्वेरीच्या एकूण २३ विद्यार्थ्यांची निवड कॅपजेमिनी कंपनीत करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या निवडीमुळे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीची संधी उपलब्ध झाल्याने विशेषतः पालक वर्गात  आनंदाचे वातावरण पसरले आहे. एकूणच स्वेरीत मिळणाऱ्या संस्कारामुळे विद्यार्थी प्रगतीच्या दिशेने झेपावत आहेत. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रा. अविनाश मोटे प्रा. आशिष जाधव व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदेउपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्तस्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्यअधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.