माहेरातून 4 लाख आणले नाहीत म्हणुन सासरच्यांनी घेतला विवाहितेचा बळी... पंढरपूर तालुक्याच्या शेळवे येथील संतापजनक घटना 

आधी 4 लाख माहेरातून आण असा तगादा लावुन विवाहितेचा छळ केला नंतर तिची हत्या करून ही हत्या नसुन आत्महत्या असल्याचा बनाव केला असल्याची तक्रार विवाहितेच्या माहेरच्यांनी पोलिसांत दिलीय. 

माहेरातून 4 लाख आणले नाहीत म्हणुन सासरच्यांनी घेतला विवाहितेचा बळी... पंढरपूर तालुक्याच्या शेळवे येथील संतापजनक घटना 
शेळवे (ता. पंढरपूर) येथील एका विवाहितेला मुलगा होत नाही म्हणून मुलाचे दुसरे लग्न लावण्यासाठी सुनेलाच तिच्या माहेरातून 4 लाख रूपये आणण्याची मागणी करत तिला सासरच्यांकडून जाचहाट सुरू केला. 4 लाख मिळाले नसल्याने अखेर सुनेचा गळा आवळून खुन केला आणि नंतर हा खुन नसुन आत्महत्या असल्याचा बनाव सासरच्या मंडळीकडून करण्यात आला. अशी फिर्याद मयत विवाहितेच्या मावसभावाने पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत पंढरपूर ग्रामीण पोलीस स्थानकात सासरकडच्या ५  जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी यातील ३ जणांना अटक केली आहे.

........

बारामती ऑरगॅनिक्स प्रस्तुत दत्तसाई ऑरगॅनिक्स् अ‍ॅन्ड हर्बल प्रॉडक्ट एकाच ठिकाणी विना रसायन आणि नैसर्गिक पध्दतीने पिकवलेली सेंद्रिय उत्पादने! संपर्क :- पत्ता : अर्बन बँक प्रशासकीय इमारती शेजारी, नवी पेठ, पंढरपूर मोबाईल : 9028592324, 7798992630

......................

मयत विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेळवे (ता.पंढरपूर) येथील निकिता उर्फ सोनाली दत्तात्रय शिनगारे हिचा सासरकडील मंडळी वारंवार छळ करीत होते. यामुळे मी स्वत: व आमचे मामा विलास चव्हाण, तात्या नागटिळक, संतोष चव्हाण आम्ही दोन ते तीन वेळा निकिताच्या घरी जाऊन सासरकडच्या मंडळींना समजावून सांगितले. परंतू तरीही ते निकिताला त्रास देत होते. निकिताचा दीर नितीन शिनगारे हा निकिता घरी एकटी असताना तिच्या हाताला धरणे, तिच्याकडे बघणे, शरीर संबंधाची मागणी करत तिची छेड काढत होता. त्याला निकिताने विरोध केला असता त्याने जीवे मारण्याची धमकी देत होता. याबाबत सुद्धा शिनगारे परिवाराला समजावून सांगितले. परंतू ते सर्व निकिता ऐवजी नितीनचीच बाजू घेऊन त्याच्या गैर कृत्याचे समर्थन करत होते. सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने निकिताला त्रास देत होते.  

दि. ३१ मार्च  रोजी मला माझे पाहुणे सदाशिव गाजरे यांनी फोन करून तुमची मावस बहीण निकिता हिने शेतातील लिंबाच्या झाडास सायंकाळी ६.३० वाजेच्या  सुमारास गळफास घेतला असे सांगितले. म्हणून आम्ही तात्काळ शेळवे ता.पंढरपूर येथे गेलो. घटनास्थळी जाऊन पाहिले असता निकिता ही लिंबाच्या झाडाखाली पडलेली दिसली. त्यावेळी तिच्या गळ्याला दोरी होती. दोरी तुटलेल्या लिंबाचे झाडाच्या फांदीला बांधलेली होती. या प्रकारावरून असे दिसते की, निकिताला नेहमी त्रास देणारे दीर नितीन उर्फ नाना दिलीप शिनगारे, सासरा दिलीप माणिक शिनगारे, अतुल हरि गाजरे सर्व रा. शेळवे, सखाराम ज्ञानेश्‍वर गाजरे, ननंद सविता सखाराम गाजरे दोघे रा. इसबावी यांनी तिचा गळा दोरीने आवळून जीवे ठार मारून तिला त्यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाच्या फांदीला अडकावून तिने गळफास घेतला असा भास निर्माण केला आहे. त्यामुळे या वरील सर्वांनी माझी बहिण निकीता उर्फ सोनाली दत्तात्रय शिनगारे (वय २६ ) हिला दोरीने गळफास देऊन ठार मारले असल्याबाबतची फिर्याद दि. १ एप्रिल रोजी निकिताचा मावस भाऊ उदय संजय पवार रा. गोपाळपूर यांनी दिली आहे. याप्रकरणातील ३ आरोपींना पोलीसांनी अटक केली असून त्यांना शनिवार  पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक  प्रशांत भस्मे हे करित आहेत. 
दोन्ही मुली असल्यामुळे आणि मूलाचेे दुसरे लग्न 
करण्यासाठी पैशाची सुनेला माहेरातून पैसे आणण्याची मागणी करीत वारंवार तिचा छळ करून अखेर तिला ठार मारून तिने आत्महत्या केल्याचा बनाव केल्याच्या या घटनेमुळे संपूर्ण पंढरपूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
(मुख्य संपादक) (सोशल मिडीया महामित्र, महाराष्ट्र शासन) (सोलापूर जिल्हाध्यक्ष- पत्रकार संरक्षण समिती)