सावकारी जाचाला कंटाळून पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

Pandharpur Live : सावकारी जाचाला कंटाळून पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथे एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची खेदजनक घटना घडली आहे.

सावकारी जाचाला कंटाळून पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या
याबाबत समजलेल्या माहितीनुसार रांझणी या. पंढरपूर येथील शेतकरी अरूण ज्ञानेश्वर माळी (वर ५०) यांना गावातील नागेश पवार, महेश अशोक दांडगे, साहेबराव घाडगे हे मागील सहा महिन्यांपासून पैशासाठी तगादा
 लावून मानसिक त्रास देेत होते. या ञासाला कंटाळून माळी यांनी विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले.
 
मयताचा मुलगा अभिजीत माळी याने दिलेल्या फिर्यादीवरून वरील तिघांविरुद्ध पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात भादवि ३०६, ५०६, ३४, महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९, ४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक किरण अवचर हे करत आहेत.