संतापजनक... आयटी कंपनीतील तरूणीवर कॅब चालकाचा बलात्कार; फोटो व्हायरल करण्याची धमकी

Pandharpur Live Online: आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणीला ओला कॅब चालकाने गुंगीचे औषध टाकलेले पाणी पिण्यास देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरूणीचे अश्लिल फोटो काढून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केले. ही घटना 4 ते 30 मार्च दरम्यान धायरी परिसरातील एका लॉजवर घडली. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतापजनक... आयटी कंपनीतील तरूणीवर कॅब चालकाचा बलात्कार; फोटो व्हायरल करण्याची धमकी

कॅब चालक प्रमोद बाबू कनोजिया (रा. कर्वेनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खराडी परिसरात राहणाऱ्या 32 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.

बारामती ऑरगॅनिक्स प्रस्तुत दत्तसाई ऑरगॅनिक्स् अ‍ॅन्ड हर्बल प्रॉडक्ट एकाच ठिकाणी विना रसायन आणि नैसर्गिक पध्दतीने पिकवलेली सेंद्रिय उत्पादने! संपर्क :- पत्ता : अर्बन बँक प्रशासकीय इमारती शेजारी, नवी पेठ, पंढरपूर मोबाईल : 9028592324, 7798992630

......................

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका आयटी कंपनीत नोकरी करते. आरोपी प्रमोद ओला कॅब चालक आहे. चार मार्चला तरुणीने मांजरी परिसरातून घरी जाण्यासाठी ओला कॅब बुक केली होती. त्यानुसार प्रमोद त्याठिकाणी कॅब घेऊन गेला. त्यानंतर तरुणी मांजरी परिसरातून कॅबमध्ये बसली. त्यावेळी तरुणीला तहान लागली असता प्रमोदने तिला गुंगी येणारे औषध टाकलेले पाणी पिण्यास दिले.

पाणी पिल्यानंतर तरुणी बेशुद्ध झाली. त्यानंतर प्रमोदने तिला धायरीतील गोकूळ लॉजवर नेले. त्यानंतर त्याने तरुणीने कपडे काढून मोबाईलमध्ये फोटो काढले. अश्लिल फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन तिच्यार बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने तरुणीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लॉजवर नेऊन वारंवार अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारीसाठी तरूणीची धावाधाव

तरुणीने सुरूवातीला स्वारगेट पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तिला मुंढवा पोलिसांकडे पाठविले. त्यानंतर मुंढवा पोलिसांनी तक्रार घेतल्यानंतर तरुणी कॅबमध्ये बसल्याचे ठिकाण हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे तो गुन्हा त्यांच्याकडे वर्ग केला आहे. या प्रकरणी आरोपीचा माग काढण्यात येत आहे.