धक्कादायक... पोलिस उपनिरीक्षकावर कोयत्याने सपासप वार... कर्मचाऱ्यांनाही विटाने मारहाण!

Pandharpur Live Online: सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यावरच सराईत गुन्हेगाराने कोयत्याने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवार पेठेत हा प्रकार घडला असून, कर्मचाऱ्याना विटांनी मारहाण केली आहे.

धक्कादायक... पोलिस उपनिरीक्षकावर कोयत्याने सपासप वार... कर्मचाऱ्यांनाही विटाने मारहाण!

पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी कुमार भागवत चव्हाण व प्रतिक पृथ्वीराज कांबळे (दोघेही रा. 251 मंगळवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कुमार चव्हाणला पकडले आहे. पण, प्रतीक कांबळे हा पसार झाला आहे. प्रतीक हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

मंगळवार पेठेत लावण्यात आलेले शासकीय कॅमेरे हलवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार उपनिरीक्षक नरेश व त्यांचे पथक या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेले होते. यावेळी प्रतीक कांबळे याने फिर्यादी यांना मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करत आता तुला जिवंत सोडत नाही, असे म्हणत हातातील लोखंडी कोयत्याने त्यांच्या अंगावर वार केले. तर कुमार याने कर्मचाऱ्यांना विटाने मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत कुमार याला अटक केली आहे. पण प्रतीक हा पसार झाला आहे. अधिक तपास फरासखाना पोलीस करत आहेत.