संतापजनक... रेल्वे अधिकाऱ्याने घरकाम करणाऱ्या महिलेला ओढत बेडरूममध्ये नेले आणि....

Pandharpur Live Online: पुणे शहरातील एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने आपल्या घरातील घरकाम करणाऱ्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत जबरदस्तीने किचनमधून बेडरुममध्ये ओढत नेले. तेथे बेडवर पाडून विनयभंग करत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर शिवीगाळ करत दमदाटी केली अशी फिर्याद पीडित महिलेने केली आहे.

संतापजनक... रेल्वे अधिकाऱ्याने घरकाम करणाऱ्या महिलेला ओढत बेडरूममध्ये नेले आणि....

पुणे शहरामध्ये रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर ऍट्रोसिटी, फसवणूक व विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याकडे घरकामाला असलेल्या महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विजयसिंग शहाजी दडस (वय 40, रा.संगमपार्क, रेल्वे वसाहत, बंडगार्डन) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एका 27 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दडस हे रेल्वेच्या पुणे विभागात वरिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. फिर्यादी महिला व तिचे पती 2019 पासून सरकारी निवासस्थानाच्या आऊट हाऊसमध्ये राहून दडस यांच्याकडे घरकाम करतात. दडस यांनी फिर्यादीच्या पतीला रेल्वेमध्ये नोकरी लावतो म्हणून दोन लाख रुपयांची मागणी केली होती. त्यांच्या पतीने दीड लाख रुपये दिले होते. यानंतरही दडस यांनी त्यांच्या पतीला नोकरी लावली नाही.

दरम्यान, पती-पत्नी दोघांनीही दडस यांच्याकडे दिलेले पैसे परत मागितले. मात्र, ते नेहमी टाळाटाळ करत होते. फिर्यादी हे अनुसूचीत जाती जमातीचे असल्याचे माहित असूनही त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली जात होती. यानंतर एके दिवशी दडस यांनी फिर्यादीला शरीरसुखाची मागणी करत जबरदस्तीने किचेनमधून बेडरुममध्ये ओढत नेले. तेथे बेडवर पाडून विनयभंग करत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर शिवीगाळ करत दमदाटी केली, अशी तक्रार महिलेने दिली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाय. एन. गवारी करत आहेत.