दौंड तालुका हादरला... 7 वर्षाच्या लेकरासह पत्नीचा गळा घोटला... लफडेबाज पतीने केलं प्रियेसीच्या मदतीने क्रुर कारस्थान!

Pandharpur Live Online: दौंड : प्रेमात अडसर ठरतेय म्हणून का लफडेबाज पतीने आपल्या प्रेयसीच्या मदतीने पत्नी आणि 7 वर्षांच्या निष्पाप मुलाची हत्या केल्याची घटना संतापजनक घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पती सचिन सोनवणेला पोलिसांनी अटक केली आहे.

दौंड तालुका हादरला... 7 वर्षाच्या लेकरासह पत्नीचा गळा घोटला... लफडेबाज पतीने केलं प्रियेसीच्या मदतीने क्रुर कारस्थान!

दौंड तालुक्यातील पाटस येथील स्वराज सोसायटीमध्ये 7 वर्षाच्या मुलासह आईचा गळफास घेतल्याच्या गुन्ह्याचा उलगडा अवघ्या काही तासात यवत पोलिसांनी केला आहे. मंगळवारी लीना सचिन सोनवणे आणि ओम सोनवणे या मायलेकरांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला होता.

घरातील 10 वर्षांच्या वैष्णवीने आपल्या सात वर्षाच्या भावाला आणि आईला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये पाठवले होते. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मुलीचा जबाब घेऊन पोलिसांनी पती सचिन सोनवणेची प्राथमिक चौकशी केली.

यवत पोलिसांनी सखोल चौकशी केली असता हा खूनच असल्याचे निष्पन्न झाले. पती सचिन सोनवणे याने प्रेयसीच्या मदतीने पत्नी आणि मुलाचा खून केल्याचे कबुल केले. अवघ्या एका दिवसात या खुनाचा छडा लावून आरोपीला जेरबंद करण्यात यवत पोलिसांना यश आले आहे. सचिन सोनवणे या आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपास पोलीस करत आहे.