अभिनेत्रीच्या सुंदर चेहर्‍यामागील अमानुषतेच्या दर्शनाने मनोरंजन क्षेत्रं हादरलं.. प्रेमप्रकरणात अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाची क्रुर हत्या करणारी 'ही' अभिनेत्री गजाआड

Pandharpur Live Online: कर्नाटक पोलिसांनी राकेश कटवे हत्या प्रकरणी त्याची सख्खी बहीण शनाया कटवे हिला अटक केली आहे. 

अभिनेत्रीच्या सुंदर चेहर्‍यामागील अमानुषतेच्या दर्शनाने मनोरंजन क्षेत्रं हादरलं.. प्रेमप्रकरणात अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाची क्रुर हत्या करणारी 'ही' अभिनेत्री गजाआड

शनाया ही कन्नड चित्रपटसृष्टीतील बऱ्यापैकी परिचित अभिनेत्री आहे. राकेशची हत्या केल्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे-तुकडे करण्यात आले आणि ते वेगवेगळ्या भागात फेकून देण्यात आले होते. राकेशचं शिर देवरागुडीहळच्या जंगलात सापडलं होतं. त्याच्या शरीराचे बाकी भाग गदग आणि हुबळीत सापडले होते. धारवाड पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पथके तयार केली होती.

शनायाने तिच्या साथीदारांसह राकेश कटवेचा खून केल्यानंतर खाटीकाप्रमाणे त्याच्या देहाचे तुकडे-तुकडे केले होते. राकेशच्या हत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी नेमलेल्या पथकांनी 4 संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीदरम्यान पोलिसांना शनायाचं नाव कळालं होतं. हुबळी ग्रामीण पोलिसांनी शनायाला अटक केली होती. सगळ्या आरोपींच्या चौकशीमध्ये पोलिसांना राकेशच्या हत्येचं कारण कळालं आहे.

शनाया हिचे नेयाज अहमद कतिगर याच्याशी प्रेमसंबंध होते. ही बाब राकेशला पसंत नव्हती, तो शनायाच्या प्रेमसंबंधाला विरोध करत होता. यामुळे शनाया आणि नेयाजने त्याचा काटा काढण्याचं ठरवलं होतं. त्यांनी आपल्या कटामध्ये तौसीफ चन्नापूर, अल्ताफ मुल्ला आणि अमन गिरणीवाले यांनाही सहभागी करून घेतलं होतं. 9 एप्रिल रोजी शनाया तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ज्या घरी आली होती, त्याच घरामध्ये राकेशचा नेयाज आणि त्याच्या साथीदारांनी खून केला. त्यानंतर सगळ्यांनी मिळून त्याच्या देहाचे तुकडे केले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. शनाया ही मॉडेल होती, जिने नंतर चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. 2018 साली प्रदर्शित झालेला इदम प्रेमम जीवनम हा तिचा पहिला चित्रपट होता. नुकतीच ती एका कॉमेडी शोमध्येही दिसली होती.