पंढरपूर मंगळवेढ्यात कोव्हीड सेंटर उभारणीसाठी समाधान आवताडे सरसावले! सर्वतोपरी मदत करण्याचे समाधान आवताडेंचे अभिवचन

Pandharpur Live : सोलापूर : प्रतिनिधी पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीनंतर दोन्ही तालुक्यात रुग्ण संख्या वाढत आहे, त्या पार्श्वभूमीवर कोविड सेंटर लवकर सुरू करावेत, रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत, गोळ्या औषधांवर बरे होणारे रुग्ण ऑक्सीजन वर किंवा व्हेंटिलेटरवर जाऊ नये, यासाठी वेळेवरच उपाययोजना कराव्यात अशी मागणी दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी केली आहे.

पंढरपूर मंगळवेढ्यात कोव्हीड सेंटर उभारणीसाठी समाधान आवताडे सरसावले!  सर्वतोपरी मदत करण्याचे समाधान आवताडेंचे अभिवचन

मंगळवेढा तालुक्यातील मरवडे ,भोसे ,आंधळगाव,बोराळे, लक्ष्मी दहिवडी व पंढरपूर तालुक्यातील कासेगाव ,गादेगाव, खर्डी इतर पाच हजार लोकसंख्येच्या पुढील गावात कोविड सेंटर जिल्हा परिषद मार्फत सुरू करण्याची मागणी आवताडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केले आहे.

 दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील 5 हजार लोकसंख्या असलेल्या गावात कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या धर्तीवर मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील गावात लवकरात लवकर कोविड सेंटर सुरू करून रुग्णांना दिलासा द्यावा अशी आग्रहाची मागणी समाधान आवताडे यांनी केली आहे.

 सदर बैठकीत दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे म्हणाले की, नुकत्याच संपन्न झालेल्या पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक नंतर वाढलेली रुग्ण संख्या पाहता तालुकास्तरावर या महामारीचा प्रकोप आटोक्यात आणण्यासाठी काही दिवसांपूर्वी मी स्वतः मंगळवेढा येथील आढावा बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व इतर प्रशासकीय आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन सर्वतोपरी सहकार्य अनुषंगाने मदत करण्याचे अभिवचन दिले आहे. या महामारीचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकदिलाने व समन्वयाने कार्य करणे खूप आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.

 सोलापूर जिल्ह्यात कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा अशा सूचना जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी प्रशासनास केल्या आहेत.

 ग्रामीण भागात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने कोविड केअर सेंटर उभारण्याबाबत महत्वाची बैठक अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली.

 याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

 या बैठकीला उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, सदस्य आनंद तानवडे, मदन दराडे, अँड.सचिन देशमुख, बाळासाहेब देशमुख, गणेश पाटील, अतुल पवार, अजित तळेकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार, आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव, वरिष्ठ लेखा अधिकारी सुर्वे, सरोज काझी, देवानंद गुंड , सरपंच डॉ अमित व्यवहारे, आष्टी ग्रामसेवक गडेकर हे उपस्थित होते

 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या नंतर दोन्ही तालुक्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची होती, कोव्हीड केअर सेंटर उभे करण्यासाठी निधीची उपलब्धता कशी होणार याची चर्चा झाली.

 लवकरच लवकर संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांना वेळेवर उपचार व नियंत्रणाखाली ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या.

 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील 5 हजार लोकसंख्या असलेल्या गावात कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या विषयावर चर्चा झाली, लवकरात लवकर हे सेंटर उभे करून कोरोना बाधितांवर उपचार करण्याचा निर्णय झाला.

 याप्रसंगी सदस्य तानवडे, दराडे, अँड.देशमुख यांनी विविध सूचना केल्या, या बैठकीत सरपंच डॉ अमित व्यवहारे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून कोविड सेंटरला आपली सेवा देण्याची तयारी दर्शवली.

 सभापती विजयराज डोंगरे म्हणाले, झेडपीचा कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय स्तुत्य आहे, झेडपी सेस, आरोग्य विभागाचा निधी राज्य सरकारचा निधी वापर करावा, मोहोळ तालुक्यात आष्टी, शेटफळ, नरखेड, कुरुल, कामती, बेगमपूर याठिकाणी कोविड केअर सेंटर लवकरच सुरू होणार आहेत.