कर्मयोगी अभियांत्रिकीमध्ये ऑनलाईन कार्यशाळा संपन्न ; घनकचरा व्यवस्थापन ही व्यवसायाची संधी- रोहन परिचारक

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित, कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग विभागामध्ये एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा मोठ्या उत्सवात संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. सदर कार्यशाळा 2 एप्रिल 2021 रोजी ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाली. कोरोना च्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सिव्हिल इंजिनिअर विभागात विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले.

कर्मयोगी अभियांत्रिकीमध्ये ऑनलाईन कार्यशाळा संपन्न ; घनकचरा व्यवस्थापन ही व्यवसायाची संधी- रोहन परिचारक

सिव्हिल विभागाच्‍या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय कार्यशाळेच्या अध्यक्षपदी श्री रोहन परिचारक होते. कार्यशाळा उद्घाटन प्रसंगी श्री रोहन परिचारक म्हणाले घनकचरा व्यवस्थापनामध्ये अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसाय करण्याच्या मोठ्या संधी आहेत त्याचा सिव्हिल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. तसेच सदर कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील व उपप्राचार्य प्राध्यापक जगदीश मुडेगावकर यांचे मार्गदर्शन लाभले.

र्गिक पध्दतीने पिकवलेली सेंद्रिय उत्पादने! संपर्क :- पत्ता : अर्बन बँक प्रशासकीय इमारती शेजारी, नवी पेठ, पंढरपूर मोबाईल : 9028592324, 7798992630

......................

 या प्रसंगी बोलताना प्रा. मुडेगावकर म्हणाले विद्यार्थ्यांना कार्यशाळेच्या माध्यमातून तज्ञ मार्गदर्शकाकडून मिळालेल्या ज्ञानाचा फायदा होईल व आपले भविष्य उज्वल होईल. सदर कार्यशाळेसाठी ऍण्टोनी लारा इनविवो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या कंपनीचे बी. एल. एफ. ऑपरेशन ऑफिसर श्री गौरव पवार यांनी ‘’सस्टेनेबल प्रॅक्टिसेस फॉर लॅण्ड फील ऑपरेशन्स’’ या विषयावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. यामध्ये माहिती देताना घनकचरा व्यवस्थापन व घनकचरा नियोजन कसे करावे, तसेच घनकचरा वापरून शेतीसाठी खते म्हणून कसा वापर करावा, याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. या क्षेत्रात करिअरची खूप मोठी संधी आहे, विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

या ऑनलाईन कार्यशाळेसाठी सिव्हिल विभागातील विभाग प्रमुख प्रा. अनिल बाबर, कार्यशाळेचे संयोजक प्रा. प्रदीप झांबरे तसेच विभागातील प्रा. अतुल सुतार, प्रा. सागर पवार, प्रा. मनीषा पाटील, प्रा. विकास साळुंके, प्रा. समीर उपासे, प्रा. केदार बरसावडे व आय टी प्रमुख प्रा. दीपक भोसले यांनी परिश्रम घेतले कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. अनिल बाबर व प्रा. प्रदीप झांबरे यांनी केले, तसेच आभार प्रा. मनीषा पाटील यांनी मानले