मोठी बातमी : 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा होणार बाद, पण आधी जाणुन घ्या हे नियम व अटी!

Pandharpur Live Online नवी दिल्ली : मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा या आर्थिक वर्षाच्या अखेरीस किंवा एप्रिल 2021 पर्यंत व्यवहारातून बाद केल्या जातील असं सांगितलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सहायक महाव्यवस्थापक बी महेश यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, या जुन्या नोटांची मालिका मागे घेण्याच्या योजनेवर आरबीआय सध्या काम करत आहे. पण नोटा बाद करण्याआधी 100, 10 आणि 5 च्या नवीन नोटा बाजारात आणल्या जातील अशीही माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे सध्या नोटांवर बंदी नसून बाजारात नव्या नोटा आल्या की जुन्या नोटा बाद होतील.

मोठी बातमी : 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा होणार बाद, पण आधी जाणुन घ्या हे नियम व अटी!

मनी कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, बी महेश यांनी जिल्हा स्तरीय सुरक्षा समिती अर्थात डिस्ट्रिक्ट लेवल सिक्योरिटी कमिटी मिटिंगमध्ये हे सांगितलं आहे.

100 रुपये, 50 रुपये आणि 5 रुपयाच्या जुन्या नोटांच्या बदल्यात, नव्या नोटा आधीच सर्कुलेशनमध्ये आल्या आहेत. त्यामुळे जुन्या नोटा बंद केल्यास लोकांना समस्या येणार नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं की, नोटबंदीवेळी लोकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आरबीआय आधी हे निश्चित करेल की, जितक्या जुन्या नोटा सर्कुलेशनमध्ये आहेत, तितक्याच नोटा मार्केटमध्ये याव्यात, जेणेकरून लोकांना कोणतीही समस्या येऊ नये. तसंच ही सीरीज अचानक बंदही केली जाणार नाही.

आरबीआय वेळोवेळी जुन्या नोटा परत घेऊन, नवीन नोटा जारी करते. नकली नोटांवर लगाम घालण्यासाठी आरबीआयकडून हे पाऊल उचललं जातं. बँकेने अधिकृतरित्या घोषणा केल्यानंतर, सर्वांना सर्व जुन्या नोटा बँकेत जमा कराव्या लागतात.

2019 मध्ये आरबीआयनं 100 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या. पण तरी 100 रुपयांच्या जुना नोटाही ग्राह्य असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. पण आता 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा विचार आहे.

अनेक व्यापारी किंवा दुकानदार १० रूपयांचे नाणे घेण्यास नकार देत आहेत. यावर आरबीआयचे म्हणणे आहे की, ही बँकेसाठी अडचण आहे, म्हणून अशा अफवा टाळण्यासाठी बँक वेळोवेळी सल्ला देते. तरी देखील अनेक लोक चलनामध्ये 10 रुपयांचे नाणे घेण्यास नकार देतात. यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरी लोकांनी दहा रुपयांच्या नाण्यांविषयी कोणत्याही अफवांवर लक्ष देऊ नये.