खळबळजनक... मोक्का कारवाई केलेल्या टोळीप्रमुख दीप्ती काळेचा ससूनच्या ८ व्या मजल्यावरुन पडून मृत्यू ; दीप्ती काळेच्या अटकेवरुन निवृत्त लेफ्टनंट कमांडर पतीने केली होती थेट परराष्ट्रमंत्र्यांकडे तक्रार

Pandharpur Live Online : पुणे : आजच मोक्का कारवाई झालेल्या दीप्ती काळे हिचा ससून रुग्णालयातील ८ व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली. मराठे ज्वेलर्सचे मिलिंद मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात दीप्ती काळे हिला पोलिसांनी अटक केली होती. अ‍ॅड. दीप्ती काळे यांना पोलिसांनी मध्यरात्रीनंतर घरी जाऊन अटक केल्याप्रकरणी त्यांचे पती लेफ्टनंट कमांडर श्रीवास्तन रामाणी (निवृत्त) यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. सुब्रमण्यम जयशंकर यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यात त्यांनी दीप्ती काळे यांच्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली होती.

खळबळजनक... मोक्का कारवाई केलेल्या टोळीप्रमुख दीप्ती काळेचा ससूनच्या ८ व्या मजल्यावरुन पडून मृत्यू ; दीप्ती काळेच्या अटकेवरुन निवृत्त लेफ्टनंट कमांडर पतीने केली होती थेट परराष्ट्रमंत्र्यांकडे तक्रार

दीप्ती काळे हिच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या पार्श्वभूमीमुळे पुणे पोलीस आणि तिच्यावर आजच मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका गुन्ह्यात काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर तिचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे तिला ससून रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते.

रुग्णालयातील बाथरूममधून इमारतीच्या खाली घेतली उडी

दरम्यान, आज सायंकाळच्या सुमारास तिने रुग्णालयातील बाथरूममधून इमारतीच्या खाली उडी मारली. यामध्ये गंभीररित्या जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

मराठे ज्वेलर्सचे मिलिंद मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात दीप्ती काळे हिला पोलिसांनी अटक केली होती. दीप्ती काळे हिला कोरोनाची लागण झाल्याने तिच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. आज दुपारी ती कपडे धुण्यासाठी बाथरुममध्ये गेली होती. जवळपास २० मिनिटे झाली तरी दीप्ती बाहेर न आल्याने गार्डने आतील कानोसा घेतला़ परंतु, आतून काहीही आवाज येत नव्हता. तेव्हा इतरांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला तर बाथरुमच्या खिडकीच्या काचा काढून ठेवलेल्या दिसून येत होत्या. ती खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

दीप्ती काळे आणि निलेश शेलार यांना विश्रामबाग पोलिसांनी १८ एप्रिल रोजी अटक केली होती. ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले असताना दीप्ती काळे हिने औषधांच्या गोळ्या घेतल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तिची कोरोना चाचणी केल्यावर ती पॉझिटिव्ह आल्याने तिच्यावर उपचार करण्यात येत होते.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार आजच दीप्ती काळे, निलेश शेलार यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

अ‍ॅड. काळे हिने इतरांच्या मदतीने बांधकाम व्यावसायिकाशी शारीरीक जवळीक साधून त्यांच्याकडून जबरदस्तीने ४२ गुंठे जमीन स्वत:च्या नावावर करुन घेतली. तसेच आणखी ५८ गुंठे जमीन नावावर करुन देण्यासाठी धमकाविल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दीप्ती सरोज काळे (रा. बावधन), निलेश शेलार (रा. कोथरुड), नितीन हमने व दोघा अनोळखी व्यक्तीविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिने बांधकाम व्यावसायिकाशी जवळीक साधून त्याच्याबरोबर संबंध प्रस्तापित केले होते. त्याला बांधकाम व्यवसायासाठी ३५ लाख रुपये दिले. त्या बदल्यात मरकळ येथील ४२ गुंठे जमीन स्वत:च्या नावावर करुन घेतली होती. त्यानंतर उरलेली ५८ गुंठे जमीन आपल्या नावावर कर, म्हणून दीप्ती काळे व तिचे साथीदार या बांधकाम व्यावसायिकाला धमकावित होते.

काही वर्षांपूर्वी पुण्यातील मध्य वस्तीतील एका राजकीय पक्षाच्या नेत्याविरुद्ध अशाच प्रकारे बलात्काराचा आरोप करुन तिने खळबळ उडविली होती. त्यानंतर तिच्याविरुद्ध खंडणी व फसवणुकीचा गुन्हा डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

दीप्ती काळे ही टोळीप्रमुख असून मागील १० वर्षात संघटित गुन्हेगारी टोळी तयार करुन प्रत्येक गुन्ह्यांमध्ये वेगवेगळे सदस्य घेऊन खुनाचा प्रयत्न, आत्महत्येस प्रवृत्त करणे, कट करुन खंडणी व बनावट व्हिडिओ तयार करुन अपलोड करणे असे गुन्हे केले आहेत. त्यामुळे पोलिसांनी तिच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

Advertised on Pandharpur Live

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

दीप्ती काळेच्या अटकेवरुन निवृत्त लेफ्टनंट कमांडर पतीने केली होती थेट परराष्ट्रमंत्र्यांकडे तक्रार

अ‍ॅड. दीप्ती काळे यांना पोलिसांनी मध्यरात्रीनंतर घरी जाऊन अटक केल्याप्रकरणी त्यांचे पती लेफ्टनंट कमांडर श्रीवास्तन रामाणी (निवृत्त) यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. सुब्रमण्यम जयशंकर यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यात त्यांनी दीप्ती काळे यांच्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली होती.

काळे यांचे पती रामाणी हे कॅनेडियन नागरिक असून सध्या ते मोठ्या मुलाकडे कॅनडा येथे वास्तव्याला आहेत. रामाणी हे इंडियन नेव्हीमध्ये लेफ्टनंट कमांडर होते. परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांना पाठविलेल्या पत्रात रामाणी यांनी आपली पत्नी दीप्ती काळे ही लहान मुलासह पुण्याला राहत आहे.

यापूर्वी दीप्ती काळे हिच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत आपण पुणे पोलीस आयुक्तांची २०१९ मध्ये भेट घेऊन पुरावे दिले होते. पोलिसांनी आता तिला अटक केली आहे. पोलीस कोठडी दरम्यान तिच्या जीवाला धोका आहे. आपले कोणी नातेवाईक या प्रसंगी पुण्यात नाही. सध्याच्या कोविडच्या काळात चेन्नईहून नातेवाईकांना पुण्यात येणे अशक्य आहे. माझ्याकडे काही पर्याय नसल्याने आपल्याशी पत्रव्यवहार करत असल्याचे रामाणी यांनी या पत्रात म्हटले आहे. याबाबतची माहिती अ‍ॅड. तौसिफ शेख यांनी दिली.

दरम्यान, अ‍ॅड. दीप्ती काळे ही पोलीस संरक्षणात असल्याने तिच्या मृत्युची नियमानुसार राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी केली जाईल.