अतिशय चुरशीच्या लढतीत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडेंनी मारली बाजी! किंगमेकर ठरले आमदार प्रशांत परिचारक

Pandharpur Live अखेर पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला असुन अतिशय चुरशीच्या या लढतीमध्ये भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भारत भालके यांचा 3733 मतांनी पराभव करत या निवडणुकीत बाजी मारली आहे.

अतिशय चुरशीच्या लढतीत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडेंनी मारली बाजी! किंगमेकर ठरले आमदार प्रशांत परिचारक
अखेर पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला असुन अतिशय चुरशीच्या या लढतीमध्ये भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भारत भालके यांचा 3733 मतांनी पराभव करत या निवडणुकीत बाजी मारली आहे.

विजयाची घोषणा होताच भाजपाचे विजयी उमेदवार समाधान आवताडे यांना खांद्यावर घेऊन परिचारक व आवताडे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला
आवताडे यांच्या विजयासाठी आमदार प्रशांत परिचारक यांनी केलेली मोर्चेबांधणी अखेर यशस्वी ठरली असुन आमदार प्रशांत परिचारक हे या विजयाचे किंगमेकर ठरले आहेत.
३७३३ मताने समाधान आवताडे विजयी
एकूण 
आवताडे १ लाख ९ हजार ४५०
भालके १ लाख ५ हजार ७१७
खरंतर ही पोटनिवडणूक महाविकास आघाडी आणि भाजपा च्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी अतिशय प्रतिष्ठेची केली होती.
 
राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे, काँग्रेस नेते नाना पटोले ,आमदार रोहित पवार, आमदार सुनील आण्णा शेळके यांच्यासह अनेकांनी पंढरपूर-मंगळवेढा पिंजून काढले.
 
त्याला प्रत्त्यूतर देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेकांनी गल्लीबोळातील पायऱ्या झिजवल्या. 'तुम्ही विजयी कौल द्या, आम्ही राज्यात करेक्ट कार्यक्रम करतो' असे सांगून राज्याच्या राजकारणात ही निवडणूक किती महत्त्वाची आहे हे सांगण्याचा प्रयत्न दोन्हीबाजूने झाला. 

Adv.

अखेर अतीतटीच्या या निवडणुकीत भाजपाचे समाधान आवताडे यांनी आमदार प्रशांत परिचारक,  मोहिते-पाटील व सहकारी, कार्यकर्त्यांच्या मदतीने ही निवडणूक जिंकून दाखवली. आणि पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात कमळ फुलले.