Grateful : 'भारत माझं दुसरं घर' म्हणतऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट लीनं भारताला ऑक्सिजनसाठी केली 43 लाखांची मदत

Pandharpur Live Online : भारत माझं दुसरं घर' म्हणतऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट लीनं भारताला ऑक्सिजनसाठी 43 लाखांची मदत केली आहे.

Grateful : 'भारत माझं दुसरं घर' म्हणतऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट लीनं भारताला ऑक्सिजनसाठी  केली  43 लाखांची मदत

ब्रेट लीनं मदत जाहीर करताना भारत हे माझं दुसर घर असल्याची भावना व्यक्त केली आहे. भारतातील कोरोना परिस्थितीवरून त्यानं चिंता व्यक्त केली आहे. क्रिकेटमधील कारकीर्द आणि निवृत्तीनंतर इथल्या लोकांचं माझ्या मनात विशेष स्थान आहे. आपल्याला एकत्र येऊन लढण्याची गरज ब्रेट लीनं व्यक्त केली. ब्रेट लीनं ऑक्सिजन खरेदीसाठी 1 बिटकाईन म्हणजेज 43 लाखांची केली आहे.

ब्रेट लीचं ट्विट

पॅट कमिन्सकडून 50 हजार अमेरिकन डॉलर्सची मदत

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्सने  50 हजार अमेरिकन डॉलर्सची (जवळपास 37 लाख रुपये) मदत केली आहे. कमिन्सने पीएम केअर फंडाला ही मदत दिली आहे. पॅट कमिन्स सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळत आहे.

कमिन्सने त्याच्या या मदतीबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती. तसेच त्याने आयपीएलमध्ये खेळणाऱ्या इतर खेळाडूंनादेखील अशीच मदत करण्याचे आवाहन केलं होतं. कमिन्सने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "एक खेळाडू म्हणून माझ्यासुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत आणि मी पीएम केअर फंडासाठी काही निधी दान करत आहे, विशेषकरून भारतातील हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनच्या खरेदीसाठी हा निधी असेल. आयपीएलमधील मी माझ्या सहकाऱ्यांनाही मदतीचं आवाहन करतो, असं तो म्हणाला होता.

Advertised on Pandharpur Live

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>